Advertisement

गंभीर जख्मी अजगर सापाला उपचारासाठी केले स्वाधिन

वन विभाग नागपुर पथकास गंभीर जख्मी अजगर सापाला उपचारासाठी केले स्वाधिन

 

कन्हान  शहरातील सत्रापुर येथे अजगर प्रजातीचा साप गंभीर जख्मी अवस्थेत असल्याच्या माहितीवरून वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान च्या सदस्यांनी घटनास्थळी पोहचुन अजगर सापाची जख्म गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता वन विभाग नागपुर च्या पथकाच्या स्वाधिन केले.

पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे सत्रापुर शिवारात एक अजगर प्रजातीचा साप अतिशय जख्मी अवस्थेत आढळुन आल्याने स्थानिक लोकांनी वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान (नागपुर) व वन विभागाला लगेच त्या सापाची माहिती दिली असता संस्था सदस्य सर्पमित्र राम जामकर , अविनाश पास्पलवार , राजकुमार बावने , प्रीतम ठाकुर , विशाल इंगळे आदीने त्वरित पोहचुन सापाची स्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सापास ताबडतोब नागपुर वन विभागाच्या स्वाधिन सोपविले .अश्या कुठल्याही प्रकारचे जख्मी साप किंवा घरातील आढळलेले साप , पक्षी कुठल्याही प्रकारचे वन्य प्राणी आढळल्यास त्यांना न मारता लगेच वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्थेला किंवा वन विभाला सुचना द्यावी. असे केल्यास प्राण्यांचे आणि लोकांचे रक्षण करण्यात येऊन दोघांना ही जीवनदान मिळेल अशी माहिती या प्रसंगी संस्था सदस्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले .

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या