रामटेक खिंडसी जवळील शिरपूर फाट्यावर झाला भिषण अपघात | एक मृत एक गंभीर घायल
रामटेक:- रामटेक ते तुमसर महामार्गावर दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी शिरपूर ( बोरी ) शिवारात टाटा सुमो व मोटार सायकल च्या झालेल्या भिषण अपघातात मोटार सायकलचा अक्षरशः चेंदामेंदा होवून मोटार सायकल चालक घटनास्थळीच मरण पावला तर मागे बसलेल्याची हालत गंभीर आहे.
मौजा नयाकुंड, तालुका पाराशिवनी येथील चालक हरीशंकर त्रिवेदी हा टाटा सुमो क्र.एम.एच – 29 वि-9884 घेवून रामटेक वरून तुमसर ला जात असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टाटा सुमो गाडी समोरून येणाऱ्या मोटार सायकल वर आदळून भिषण अपघात झाला.
हा अपघात इतका भयानक होता की मोटार सायकल चा अक्षरशः चेंदामेदा होवून यातील मोटार सायकल चालक विलास टेंभरे वय 26वर्ष मुक्काम देवटोला, दवनीपाडा, गोंदिया याने घटनास्थळीच दम सोडला. तर मागे बसलेला सुमीत मुलचंद हरीणखेडे वय 25 हा गंभीर जख्मी झाला.
प्राप्त माहीती नुसार दोघेही मोटार सायकलने देवटोला, गोंदिया येथुन रामटेक मार्गे नागपूर ला सेंट्रिंग च्या कामाला जात असता शिरपूर फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघाताचा पुढिल तपास रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक हृदय नारायण यादव यांच्या नेतृत्वात त्यांची चमु करीत आहे.
प्रतिनिधी- हर्षपाल मेश्राम रामटेक
0 टिप्पण्या