Advertisement

टेकाडी येथे महिला सह २९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

टेकाडी येथे महिला सह २९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कन्हान – समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार व्दारे आयोजित रक्तदान शिबिरात महिला सह २९ रक्तदात्यांनी रक्तदान करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला.

टेकडी येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी द्वारे संचालित राजे फाउंडेशन व दिनेश चिमोटे मित्र परिवार यांच्या पुढाकाराने लाईफ लाईन ब्लड बँक च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीरास स्वयंफुर्त लोकांचा प्रतिसाद मिळाला. शिबिरात लक्ष्मीकांता पंकज मोहाडे, रेश्मा रवि मोहाडे दोन महिला व २७ पुरू़ष असे एकुण २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबीरात रक्तदान करण्यास अनेक महिलांनी इच्छा दर्शवली परंतु वेगवेगळ्या कारणास्तव त्याना रक्तदान करता आले नाही. महिलाच्या या पुढाकाराने आनंद व्यकत करण्यात आला. या रक्तदान शिबिराला गावातील नागरिकांनी तसेच अनेक संघटनाने उपस्थिती दर्शविली. रक्तदान शिबिराचे आयोजन दिनेश चिमोटे यांच्या वाढदिवसा निमित्त करण्यात आले होते.

या शिबिरांच्या यशस्विते करिता सुरेश मोहाडे, गणेश मस्के, मनोज लेकुरवाडे, प्रविण चव्हाण, किशोर गाडगे, देवेंद्र वासाडे, मनोज गुळधे, पंकज मोहाडे, निलेश राऊत, पूर्वेश निमकर, प्रमोद मोरे, अभिजीत कुरडकर, अतुल कोरडकर, अक्षय बोबडे, प्रशांत टाकळखेडे, चंद्रप्रकाश नागतोडे, सचिन चीमोटे, सचिन ढोबळे आदि ग्रामस्थ आणि गुरुकृपा आखाडा टेकाडी, थोर पुरुष विचार मंच टेकडी, युवा सामाजिक संघटन टेकाडी आदीने विशेष सहकार्य केले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या