कृषी विभाग पारशिवनी द्वारे पौष्टिक तृणधान्य बियाणे किट वाटप
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घटाटे ग्राम पंचायत कार्यालय खंडाळा (घ) या गावात रविवार ला पारशिवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत बियाणे मिनीकीट वाटप उपसरपंच मा.चेतन रमेश कुंभलकर यांचा शुभहस्ते ज्वारी , बाजरी , राजगीरा , राळ या पिकाचे बियाणे मिनिकीट वाटप करण्यात आले .
यावेळी मा.व्हीं.एस.शिंदे कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य पिकाचे महत्त्व सांगितले . या प्रसंगी मा.प्रफुल नागपुरे (कृषी मित्र) , मा.शरद भारद्वाज , मा. हरीचंद शेंडे , मा.मनोज हटवार , मा.तेजरामजी कुंभलकर , मा धनिरामजी ऊके , आकाश राऊत , अभिषेक भारद्वाज , रंजीतजी चकोले , अभिषेक वानखेडे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते .मा. सुहास साठे कृषी सहाय्यक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक
0 टिप्पण्या