ब्रेकिंग न्यूज कन्हान सत्रापुर शिवारात जुन्या वादातुन भरदिवसा युवकाची हत्या
एक जख्मी, तीन आरोपी अटक
कन्हान-कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर शिवार येथील शितला माता मंदिरा जवळ जुन्या वादातुन एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन नागरिकांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज गुरूवार दिनांक २० जुलै ला दुपारी च्या दरम्यान शितला माता मंदिरा जवळ सत्रापुर येथे मृतक जयराज भीमराव गायकवाड वय अंदाजे ३७ वर्ष आणि जख्मी युवराज भीमराव गायकवाड वय अंदाजे ३५ वर्ष दोन्ही राहणार सत्रापुर हे दोघे ही सख्खे भाऊ असुन यांचा आरोपी भेंडंग पुरवले, देवेंद्र भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले यांचा जुन्या वादातुन वाद झाला.
वाद इतका विकोपाला गेला कि आरोपींनी जयराज गायकवाड व युवराज गायकवाड यांचावर चाकुने आणि ब्लेड ने सपासप मारुन गंभीर जख्मी केले. घटनेनंतर नातेवाईकांनी जयराज गायकवाड व युवराज गायकवाड यांना उपचारा करिता राय हाॅस्पीटल कामठी येथे नेले असता तेथे उपचारा दरम्यान जयराज गायकवाड याचा मृत्यु झाला.
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच सहायक फौजदार गणेश पाल, सचिन वेळेवर, मुदस्सर जमाल सह आदि पोलीस कर्मचारी यांनी राय हाॅस्पीटल कामठी येथे पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले.
सदर घटनेनंतर कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी सहयक पोलीस निरीक्षक सी.पी चव्हान, पराग फुलझले, राजेश जोशी, हरीष सोनभद्रे, सह आदि पोलीस कर्मचारी यांना परिसरात पेट्रोलिंग करण्याकरिता रवाना केले असता पोलीसांनी ताबड़तोड़ तीन ही आरोपी ला पकडण्यात यश आले.
सदर घटना गंभीर्याने घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट दिली असुन शहरात शांती सुव्यवस्था कायम राहावी म्हणून घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या