Advertisement

टैंकर ट्रक मधुन सहा टायर डिस्क चोरी करणारे तीन आरोपी गजाआड

टैंकर ट्रक मधुन सहा टायर डिस्क चोरी करणारे तीन आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांची कारवाई, सहा टायर डिस्क सह एकुण ६०,००० रु. मुद्देमाल जप्त

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार किमी अंतरावर असलेल्या हायवे इन हाॅटेल चे मागे नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर उभा असलेल्या आयसर टैंकर ट्रक मधुन सीएट कंपनीचे सहा टायर डिस्क चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन सहा टायर जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी विशाल आनंद जांभुळकर वय ४० वर्ष रा.प्लांट नंबर ४१ सन्याल नगर टेका नाका नागपुर हे अनुश्री रोड लाईन नावाचे ट्रांसपोर्ट चे काम करीत असुन त्यांचा कडे आयसर टैंकर १४ चक्का क्रमांक एम एच २२ ए एन १९६४ हे त्यांनी किरायाने घेतले असुन एलपीजी गैस भरुन जबलपुर ते आंध्रप्रदेश या लाईन वर चालतात.सदर टैंकर वर सियाराम ड्रायवर असुन अंदाजे पंधरा दिवस पासुन विशाल जांभुळकर यांचा टैंकर खराब झाल्याने त्यांनी कन्हान रिंग रोड वर हायवे इन हॉटेल चे मागे उभा करुन ठेवला होता.

शुक्रवार दि.३० जुन चे सायंकाळी ७ वाजता ते शनिवार दि.१ जुलै चे सायंकाळी ७ वाजता वाजता च्या दरम्यान आयसर टैंकर मधुन

सीएट कंपनीचे सहा टायर डिस्क कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी विशाल जांभुळकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक ४४३२३ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला होता.

सदर प्रकरणातील आरोपी च्या शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि सदर गुन्ह्यात सिहोरा गावातील सागर हुमने नामक युवक आहे.गुन्हे शाखा पोलीसांनी आरोपी १) सागर देवीदास हुमने वय २२ वर्ष रा. सिहोरा यास ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्हा बाबत विचापुस केली असता सदर गुन्हा तीन लोकांसोबत केल्याची कबूली दिली व सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा आपले घरामाघे लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पोलीसांनी त्याचे घराचे माघून गुन्हयातील सहा टायर डिस्क अंदाजे किंमत ६०,००० रुपए पंचासमक्ष जप्त करण्यात आले तसेच आरोपी २)अंकीत दुर्योधन बागडे वय २३ वर्ष रा.सिहोरा, ३) निकेश नामदेव वासनिक वय २२ वय रा. सिहोरा यांना अटक करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन करित फरार आरोपी आनंद मेश्राम याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व कन्हान पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक मा.संदीप पखाले यांचा मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, हेड कांस्टेबल विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस शिपाई अभिषेक देशमुख यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या