रामटेक येथे उद्या आमदार मा. बच्चुभाऊ कडु यांची भव्य जाहिर सभा
कन्हान-राष्ट्रीय मैंगनीज मजदुर संघ महाराष्ट्र मध्यप्रदेश द्वारे नवनियुक्त केंद्रीय अध्यक्ष, प्रहार जनशक्ती संघटने चे संस्थापक अध्यक्ष आणि अचलपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.बच्चुभाऊ कडु यांची भव्य जाहिर सभा उद्या गुरवार दिनांक ६ जुलै ला दुपारी ३:०० वाजता, गंगा भवन रामटेक येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत आमदार मा.बच्चुभाऊ कडु मॉयल कामगार, दिव्यांग, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या हितासाठी मार्गदर्शन करणार आहे.
तरी या भव्य जाहिर सभेत कामगार, अपंग, शेतकरी, तरुण महिलांनी आणि सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रीय मैंगनीज मजदुर संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सतीश किशोर बेलसरे, सेक्रेटरी जनरल पुरणदास तांडेकर सह आदि पदाधिकार्यांनी केले आहे.
प्रतिनिधि – ऋषभ बावनकर-कन्हान
0 टिप्पण्या