दत्त मंदिर कांद्री येथे विविध कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरी
कन्हान – कांद्री वार्ड क्रमांक २ येथील श्री.दत्त मंदीरात विधिवत पूजा अर्चना करुन विविध कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
सोमवार दिनांक ३ जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कांद्री वार्ड क्रमांक २ येथील श्री.दत्त मंदीरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी मंदिरात श्री दत्त मुर्तीचे दही, दुधाने जल अभिषेक आणि पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर परिसरातील नागरिकांनी मंदिरात विधिवत पूजा अर्चना केली. दुपारी मंदिरात भजन मंडळ कांद्री च्या महिलांनी भजन, कीर्तन केले आणि त्यानंतर जेष्ठ नागरिक कवडुजी आकरे यांचा हस्ते दहीकाला कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांना प्रसाद वितरण करुन गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महेंद्र पलिर, झिबल सरोदे, कवडु बारई, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, नथ्थुजी वझे, सौ.शोभा वझे, लता बावनकुळे, सुषमा गायकवाड, आशा हटवार, हिराबाई वंजारी, मंगला कामडे, सुनिता हिवरकर, सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या