Advertisement

मौजमस्तीसाठी गेलेल्या पाच मित्रांचा तलावात बुडून मृत्यू! मोहगाव झिल्पी तलावातील घटना

मौजमस्तीसाठी गेलेल्या पाच मित्रांचा तलावात बुडून मृत्यू! मोहगाव झिल्पी तलावातील घटना

मौजमस्तीसाठी गेलेल्या पाच मित्रांचा तलावात बुडून मृत्यू! मोहगाव झिल्पी तलावातील घटना सर्व मृतक मित्र नागपुरातील रहिवासी.

रविवार सुटीचा दिवस असल्याने मौजमस्तीसाठी हिंगणा तालुक्यातील  मोहगाव झिल्पी येथील तलावावर गेलेल्या सहा मित्रांपैकी पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२ जुलै) सायंकाळी चार वाजताच्या  सुमारास घडली.

सर्व मृतक नागपुरातील असून, या सर्वांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.ऋषिकेश पराळे, राहुल मेश्राम, वैभव भागेश्वर वैद्य, शांतनू आरमारकर व  नितीन कुंभारे या 5 युवकांचा मृतकांमध्ये समावेश आहे.

https://youtu.be/BQFOh902gGo

प्राप्त माहितीनुसार रविवार सुटी असल्याने ऋषिकेश पराळे घराशेजारील तीन मित्रांसोबत मोहगाव झिल्पी तलावावर मौजमस्ती करण्यासाठी गेले होते. ऋषिकेश हा डॉक्टर  प्राजक्त  लेंडे यांच्या कारवर ड्रायव्हर होता. डॉ. प्राजक्तने  ऋषिकेशला फोन केला त्यावेळी मी मित्रांसोबत तलावावर फिरायला आलो असल्याचे सांगत तुम्ही पण या असे सांगितले.

त्यानंतर डॉ. प्राजक्त  लेंडे हे सुद्धा वैभव वैद्य यांच्यासोबत कार क्रमांक एम.एच ४९ बी.के ५५०१ ने तलाव परिसरात पोहोचले. डॉ. प्राजक्त  कारजवळ थांबले होते. काही वेळाने उर्वरित चार जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. सर्व खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागले. पुन्हा काठावरील दोघे मित्र ही  मदतीला धावले, तेसुद्धा बुडाले.

डॉ. प्राजक्त मदतीला जाण्याच्या आतच पाचही जण बुडाले. त्यामुळे डॉ. प्राजक्त घाबरले.त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु कुणीही वाचविण्यासाठी पुढे आले नाही. डॉ. प्राजक्त यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. हिंगणा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विशाल काळे, पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, पोलीस निरीक्षक दत्ता वाघ स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तात्काळ गावातील पोहणारे रेखराम भोंडे, शंकर मोरे यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. रात्री आठ वाजेच्या सुमारास पाच जणांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात यश मिळाले. पंचनामा करून मृतदेह हिंगणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे,  तलाठी ऋतुजा मोहिते दाखल झाल्या.

हिंगणा पोलिसांनी नागपूर महानगरपालिका येथून अग्निशमन दलाच्या जवानांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलाविले होते. मात्र, तत्पूर्वी सर्व मृतदेह हिंगणा पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते  .

घटनास्थळी मृतकांच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली होती. गेल्या अनेक दिवसात या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांनी आपले जीव गमावले आहे. याबाबतीत प्रशासनाने त्याठिकाणी काही सुचनाफलक लावले असून सुद्धा पर्यटक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम-रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या