Advertisement

परमशांती मित्र परिवार द्वारे कन्हान ला गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी

परमशांती मित्र परिवार द्वारे कन्हान ला गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी

कन्हान-शहरातील गहुहिवरा रोड वरील परमशांती चौक कन्हान येथे परमशांती मित्र परिवार तर्फे गुरू पौर्णिमे ला गुरू पुजा कार्यक्रम करून गुरुपौर्णिमा उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.

सोमवार (दि.३) जुलै ला गुरुपोर्णिमा निमित्य परमशांती मित्र परिवार कन्हान द्वारे प्रतिष्ठीत डॉ.जामोदकर यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी मा.प्रल्हाद राऊत, मा.पंडलिक कौंडलकर, डॉ.चौबे, नगर सेवक राजेंद्र शेंदरे यांच्या उपस्थित परमशांती मित्र परिवार कन्हान अध्यक्ष गोविंदजी घारपिंडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष गोविंदजी घारपिंडे, कार्यक्रमाचे अघ्यक्ष डॉ.जामोदकर सह सर्व अतिथींंचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले. यानंतर नथुजी चरडे व चौबे मँडम यांनी सुंदर असे गीत गायन केले. अज्ञान, अंधकारातुन निघुन ज्ञानरूपी प्रकाशाकडे वाटचाल करावी जेणे करून सर्वच भावि कांचे जीवन सुखी, समुध्द होईल. असे मान्यवरांनी मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करुन गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात साजरी करित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर हुड यांनी तर प्रास्ताविक अशोक भाई घारड यानी केले. या प्रसंगी मनोहर लुहुरे, रघुनाथ खडसे, रंगरावजी ठाकरे, शालिकराम उके, वसंता खेरगडे, विजय बारके, कुलदिप राणा, प्रभाकर डोंगरे, आगया केसेट्ठी, वीर घारपिंडे, कृष्णा मेश्राम, नारायण रेवतकर, राजकुमार साखरे, विनायक धोटे, हरिनाथ लेंडे, नथ्थुलाल झलपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या