Advertisement

जिल्हाधिकारी च्या निर्दशाने कन्हान च्या १४५ रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा

जिल्हाधिकारी च्या निर्दशाने कन्हान च्या १४५ रमाई घरकुल योजना लाभार्थ्याचा मार्ग मोकळा

डॉ मनोहर पाठक यांचा शिष्ठमंडळाच्या निवेदनाची उपमुख्यमंत्री यांच्या मानद सचिवांनी घेतली दखल.

कन्हान – रमाई घरकुल योजने अंतर्गत मागील साड़े तीन वर्षात अनुसूचित जातीच्या १४५ लाभार्थ्यांच्या अर्जावर नगरपरिषद कन्हानच्या उदासीनतेमुळे कुठलिही कार्यवाही न झाल्याने लाभार्थ्यांना न्याय मिळण्यास कन्हान नगर परिषद माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक च्या शिष्ठमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिल्याने त्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी त्वरित दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालया १ जुलै ला बैठक घेऊन जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी मुख्याधिकारी यांना ७ दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने रमाई घरकुल योजना लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

कन्हान-पिपरी नगर परिषद ला रमाई घरकुल योजने अंतर्गत मागील साड़े तीन वर्षात अनुसुचित जातीच्या शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. परंतु कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासना च्या उदासीनतेमुळे १४५ लाभार्थ्यांच्या अर्ज़ावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना न्याय मिळावा या करिता कन्हान-पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या शिष्ठमंडळाने (दि.१९) जून २०२३ ला राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कड़े निवेदन सादर केले होते.

त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात १ जुलै २०२३ ला बैठक आयोजित केली. या बैठकी ला स्वत संदीप जोशी, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, उपविभागीय अधिकारी सौ वंदना सौरंगपते, कन्हान नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, भाजपा ओबीसी आघाडी महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, नगर परिषद कन्हान गट नेते राजेन्द्र शेंदरे, मनोज कुरडकर, नगरसेविका संगिता खोब्रागडे, नगरसेविका वंदना कुरडकर, अजय लोंढे, शैलेश शेळके, संजय रंगारी, विक्की सोलंकी, मयूर माटे, महेंद्र चव्हाण, सुरेश कळंबे, अमोल साकोरे बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी विपन ईटनकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना ७ दिवसाच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याकरिता कार्यवाही करावी असे निर्देश दिले. त्यामुळे यादीतील अनुसूचित जाती च्या १४५ लाभार्थ्यांना घरकुल मिळन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या