Advertisement

बोरडा सराखा गावातील नागरिकांनी पकडले चोरांना

बोरडा सराखा गावातील नागरिकांनी पकडले चोरांना

एक व्हॅन,6 दुचाकी, 2 मोबाईल,13 हजार नगद, मिरची पावडर व एक चाकु जप्त

सराखा (बोरडा ): ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सराखा सत्रापुर गावाजवळील शिवारात मोठ्या चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या 4 चोरट्यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नुकतीच आमच्या चॅनल ला प्राप्त झालेली आहे.

मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरांची मोठ्या चोरीची योजना फसल्याचे चित्र निदर्शनास येत होते.

प्राप्त माहितीनुसार, रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सत्रापुर शिवारात दि.11 जुलै रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अस्मिता ऑरगॅनिक फार्मच्या जवळील शेत परिसरात एक ओमनी कार आणि 5 दुचाकी उभ्या करून काही इसम संशयित रित्या परिसरात वावरतांना गावकऱ्यांना दिसले.

संशयाच्या आधारावर गावातील लोकांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता त्यांना शेत परिसरातील झाडी झुडपात वाहने लपवून ठेवल्याचे लक्षात आले.

जवळ जाऊन पाहणी केली असता वाहनाजवळून सर्व आरोपी पळू लागलेत. नागरिकांनी पाठलाग करून 4 चोरांना पकडले.मात्र 3 चोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झालेत.

घटनेची माहिती सराखा (बोरडा )येथील पोलीस पाटील यांना देण्यात आली.

त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशन रामटेक यांना दिली.  PSI श्रीकांत लांजेवार,   पोलीस नायक अमोल इंगोले, पोलीस शिपाही शरद गीते यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. व चोरांना ताब्यात घेतले.

यावेळी घटनास्थळावरून MH-31-BB-5939 क्रमांकाची ओमनी कार, MH-35-AD-4607 क्रमांकाची ऍक्टिवा मोपेड, MH-40-BY-8189 क्रमांकाची होंडा शाईन, MH-40-BQ-1056 क्रमांकाची यामाहा कंपनीची मोपेड, MH-35-W-4003 क्रमांकाची बजाज डिस्कवर   व MH-31-CV-5687 क्रमांकाची हिरो सीडी डीलक्स, 2मोबाईल फोन,13 हजार रुपये नगद व कापडी बॅगमध्ये 500 ग्रॅम मिरची पावडर, एक लोखंडी दांडा, व एक चाकू पोलिसांनी जप्त केले.

जप्त केलेल्या वाहनांपैकी काही वाहन चोरीचे असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेतील चोरांना अटक करून रामटेक पोलीस स्टेशनला आणून विचारणा केली असता चोरीच्या उद्देशाने परिसरात बसून असल्याची त्यांनी पोलिसांना कबुली दिली.

यातील आरोपी चिंतामण हरी मेहर वय 35 वर्ष, मिथुन हरी मेहर वय 32 वर्ष दोघेही सख्खे भाऊ रा.सालई (बाजार हिवरा) ता.रामटेक, प्रणय ललित दखणे वय 21 वर्ष रा. मामा चौक गोविंदपूर गोंदिया, व राजकुमार दुर्जन काळसरपे वय 22 वर्ष रा. बाजार चौक कुराडी ता. गोरेगाव जि.गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर राहुल राऊत वय 22 वर्ष, अविनाश मरकाम वय 25 वर्ष, इंद्रजित उर्फ आय.जी. सलामे वय 42 वर्ष रा. सालई (हिवरा बाजार ) हे पळून जाणारे इसम असल्याची कबुली दिली.

याआधारे रामटेक पोलिसांनी एकूण 3 लाख 63 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी चौघांविरुद्ध अपराध क्रमांक 46123 कलम 399,402 भा.द.वी सहकलम 425अन्वये गुन्हा नोंद केला.

घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव यांच्या मार्गदर्शनात PSI श्रीकांत लांजेवार करीत आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर सागवान चोरी व रेल्वेचे साहित्य चोरी प्रकरणात अगोदर देखील गुन्हे नोंद असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम,रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या