हनुमान मंदिर कांद्री येथे गुरु पुजन कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करा, गुरुशिष्य परंपरा स्मरण ठेवा – राजेंद्र बावनकुळे
कन्हान – कांद्री येथे पुरातन हनुमान मंदिरात शिवशक्ती डहाका मंडळ व शाहीर विक्रम वांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पुजन आणि विविध कार्यक्रम सादर करुन गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सोमवार दिनांक ३ जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कोल माईंस खदन रोड येथे हनुमान मंदिरात शिवशक्ती डहाका मंडळ व शाहीर विक्रम वांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाहीर परिषद नागपुर जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्र बावनकुळे यांचा हस्ते जय संताजी नाऱ्याचे जनक लोकशाहीर वस्ताद स्व. भिमराव बावनकुळे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राजेंद्र बावनकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करा, गुरुशिष्य परंपरा स्मरण ठेवा , असा संदेश दिला.
यावेळी गुरु पौर्णिमे च्या माध्यमातुन सर्व शाहीर लोकांनी आप आपल्या गुरु वस्ताद चे गुण, गीत आणि युवा शाहीर ग्रुप चे दिलेर बावने, चेतन बावने, करण बावने यांनी शिवरायांचे गीत नागरिकांन समोर गायन केले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरात प्रसाद वितरण करुन गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भोजराजजी घरझाडे, शालिकरामजी शेंडे, गिरधर बावने, निलेश वांढरे, भुपेश बावनकुळे, प्रफुल भनारे, वामन देशमुख, अशोक पाटील, मधुकर कांबळे, धर्मदास आपुलकर, हुकुमचंद ठाकरे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या