केरडी गावात शासन आपल्या दारी शिवीर संपन्न : शिवसेना (शिंदे गट) पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर
केरडी/(पारशिवनी):- दिनांक ०३/०७/२०२३ ला पारशिवनी तालुक्यातील केरडी गावा मध्ये केरडी गावातील शिवसेना पदाधिकारी विक्की खंडाळ, आदित्या लक्ष्मण ठाकरे व कार्यकरते व तसेच स्थानीक नागरिकांच्या मागणी वरून आमदार आशिष जयस्वाल (रामटेक विधानसभा) यांनी केरडी गावातील जिल्हा परीषद शाळे मध्ये शासन आपल्या दारी ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंन्दे यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेली योजनेचे नियोजन केरडी गावात करण्यात आले होते.
ह्या शिबीर मध्ये शासकीय योजनेचा लाभ केरडी गावातील सर्व सामान्या जनतेला मिळाला. केरडी गावातील सामान्या हथमजुरी करणारी व तसेच सर्व केरडी गावातील मान्यवर शेकडो नगरीकांनी आपल्या दारी शासन आल्या मुळे शासन आपल्या दारी या शासकीय योजनेचा लाभ भरपुर नागरीकांनी घेतला. गावातील युवा पदाधिकारी व सर्व सामान्य जनतेनी आमदार आशिष जयस्वाल व केरडी गावात शासन आपल्या दारी या शासकीय कामाला आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा ह्यावेळी शब्द सुमनानी मनापासुन धन्यवाद व्यक्त केले.
0 टिप्पण्या