Advertisement

सुरगाणा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

सुरगाणा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

सुरगाणा/नाशिक:- सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे दिनांक 14-जुलै-2023 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर IQAC आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख, प्रयोगशाळा अधिकारी सारिका भोकरे, प्रतिभा शिंपी, समुपदेशक श्री मिश्रा, प्रयोगशाळा अधिकारी राकेश महाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी शिबिर घेतले. यावेळी महाविद्यालयातील 44 विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील यांनी डॉ. स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील घुगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.डी.अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. एस. एम. भोये,

प्रतिनिधी: किशोर जाधव, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या