शेतातील झोपडी मधुन कोंबड्या, शेळी, कॉपर केबल वायर चे बंडल चोरी
कन्हान – कन्हान परिसरातील खंडाळा गावालगत असलेल्या श्रीकांत वानखेडे यांच्या शेतातील झोपडी मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एकुण ५५,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार श्रीकांत भिमराव वानखेडे वय ३० वर्ष,रा.खंडाळा (निलज) यांची शेती खंडाळा गावालगत साडेतीन एकर असुन त्या शेतामध्ये कोंबड्या,शेळ्या करिता झोपडा बांधलेला आहे . बुधवार (दि.५ जुलै) रोजी रात्री १:०० वाजता बकऱ्यांना चारापाणी व कोंबड्यांना दाना-पाणी करुन श्रीकांत वानखेडे घरी गेले होते आणि सकाळी ७ वाजता आपल्या शेतावरील झोपड्यात पोहचले असता १ शेळी व ५५ कोंबड्या व ७० फुट लांब ३ फेस कॉपर केबल वायरचे बंडल दिसुन आले नाही. झोपड्याला सुरुवाती पासुनच दरवाजा नव्हता पण ते खुल्या स्थितीत होते . श्रीकांत वानखेडे यांच्या शेतावरील झोपड्यातुन १ शेळी पांढऱ्या लाल रंगाची किंमत १०,००० रुपए , ३८ मोठ्या कोंबड्या किंमत ३८,००० रुपए , १७ लहान कोंबड्या किंमत ५१०० रुपए , कॉपर केबल वायर ७० फुट किंमत २००० रुपए असा एकुण ५५,१०० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी श्रीकांत वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या