बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे पाठ्यपुस्तक वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम थाटात संपन्न
कन्हान:-बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे अखिल भारतीय पुलक मंच परिवार आणि राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच शाखा महल नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने मंगळवार ला विद्यार्थांना पाठ्यपुस्तक वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने हायस्कुल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके, प्रमुख अतिथि कन्हान-पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, अखिल दिगंम्बर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री व श्री दिगंम्बर जैन महासमिति महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.नितिन नखाते, पुलक मंच परिवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.मनोज बंड, राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ.रिचा जैन, पुलकमंच परिवार महावीर वार्ड अध्यक्ष मा.सुजर जैन सह आदि मान्यवरांचा हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थांना शिक्षणा विषयी मार्गदर्शन करुन पाठ्यपुस्तक वितरण केले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात ठिकठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लाऊन वृक्षारोपण केले.शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका सौ.भाग्यश्री नखाते व आभार वरिष्ठ शिक्षक मा.सचिन अल्हडवार यांनी मानले.
या प्रसंगी उल्हासजी जैन, डॉ जितेंद्र गडेकर, राजेंद्र सोनटक्के, बळीरामजी दखने हायस्कुल शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानप्रकाश यादव, क्रिडा शिक्षक माधव काठोके, संजय आगरकर, रमेश उदेपुकर, दिलीप सावळकर, जितेंद्र जैन, राजेंद्र बंड, मनोज मांडवगडे, प्रितीताई जैन, सविताताई मांडवगडे, नयनाताई उमाळे, जयाताई गडेकर, राधाताई काटोलकर, रश्मीताई सोनटक्के सह आदि शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि-ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या