Advertisement

बळीरामजी दखने विकास हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक श्री बलवंतरावजी थटेरे यांचे दुखद निधन

माजी मुख्याध्यापक श्री बलवंतरावजी थटेरे यांचे दुखद निधन

शासकीय एम्स दवाखाना मिहान नागपुर येथे मरणोपरांत नेत्रदान व देहदान करण्यात येईल.

कन्हान – कन्हान शहरातील बळीरामजी दखने विकास हायस्कुल चे कर्तव्यदक्ष माजी मुख्याध्यापक श्री बलवंतरावजी थटेरे सर यांचे शुक्रवार (दि.२८) जुलै ला सायंकाळी ६ वाजता वयाच्या ८८ व्या वर्षी दुखद निधन झाले. त्यांनी विकास हायस्कुल कन्हान च्या १९६३ ला स्थापने पासुन मुख्याध्यापक पदावर निरंतर शिक्षणाचे सेवाकार्य करून १९९४ मध्ये सेवानिवृत्त होऊन ३१ वर्ष कर्तव्य दक्षपणे कार्यरत राहुन शाळेला मानसन्मान प्राप्त करून देण्यास महत्वाची भुमिका बजावली.

त्यांनीे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सेवादल चे ३५ वर्ष मुख्य प्रशिक्षक म्हणुन कार्य केेले. त्यांनी महाराष्ट्र शासनाचा श्रेष्ठ शिक्षक पुरुस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी आठ पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत देहदान व नेत्रदान करण्याचा निर्धार असल्याने त्यांचे शरीर शनिवार (दि.२९) ला सकाळी ९.३० वाजता त्यांची अंतिम यात्रा त्यांचे पुत्र अजय बलवंत थटेरे यांचे निवास स्थान प्वॉट नं.६ कपिल टॉवर कँनल रोड रामदास पेठ नागपुर येथुन काढुन शासकीय एम्स दवाखाना मिहान नागपुर येथे १० वाजता दान करण्यात येईल. त्यांच्या प्रश्चात तीन मुले, दोन मुली सर्व विवाहीत नातु, नातिन व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या