शिवसैनिकांनी फडणवीस व बावनकुळे यांचा फोटो ला जोडे मारुन पुतळा जाळुन केले निषेध आंदोल
कन्हान – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार ला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात संतापलेल्या शेकडो शिवसैनिकांनी तारसा रोड चौक कन्हान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे लावुन दोघांच्या फोटो ला जोडे मारून देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक चा पुतळा जाळुन निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्यात कलंक या शब्दावरुन वाद चांगलाच पेटला आहे. सोमवार दिनांक १० जुलै ला नागपुर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर जहरी टिका केली होती.
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे ते नागपुर ला कलंक आहे असा शब्दाचा प्रयोग केला होता. उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस व्यक्तव्या भाषेमुळे बुधवार दिनांक १२ जुलै ला तारसा चौक कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी उद्धव ठाकरे मुर्दाबाद अश्या घोषणा देत जोरदार निर्दशने करुन उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तव्याचे निषेध आंदोलन केले होते.
भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खालच्या स्तरावर बोलुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करित असल्याने संतापलेल्या शेकडो शिवसैनिकांनी शुक्रवार दिनांक १४ जुलै ला तारसा रोड चौकात रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, उपजिल्हा प्रमुख ग्रामीण प्रेम रोडेकर व कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावने यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे विरोधात मु्र्दाबाद चे नारे लावुन त्यांच्या फोटो ला जोडे मारून संताप व्यक्त करित देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध आंदोलन करण्यात आले.
या पुढे शिवसेना पक्षप्रमुख उध्वव बाळासाहेब ठाकरे व मातोश्री चा अपमान केल्यास शिवसैनिक सहन करणार नाही आणि शिवसेना पध्दतीने प्रखरपणे जश्याच तसे उत्तर देऊ ! असा इशारा सुध्दा शिवसेना पदाधिकाऱ्यां व्दारे देण्यात आले आहे.
या प्रसंगी शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, उपजिल्हा प्रमुख ग्रामीण प्रेम भाऊ रोडेकर, कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावने, दिलीप राईकवार, हबीब शेख, आंनद कल्याणी, नेवालाल पात्रे, महेंद्र भुरे, रूपेश सातपुते, बंटी हेटे, जिवन ठवकर, शिव स्वामी, पुरूषोत्तम येलेकर, प्रविण गोडे, बाला खंगारे, गोविंद जुनघरे, लाला गुडधे, जितु तिवारी, फजित खंगारे, सिध्दार्थ घरडे, सुरेश आगुटलेवार, प्रदीप बावने, अर्जुन पोटभरे, भुरा पात्रे, महेंद्र खडसे, लखन पुरवले, चंदु पात्रे, अरूण खडसे सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या