वनविभाग अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणामुळे हरणाचे मृत्यु
कन्हान – कन्हान परिसरातील खोपडी (खेडी) येथे वनविभाग अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणामुळे हरणाचे मृत्यु झाल्याने नागरिकांन मध्ये वनविभागा विरोधात मोठ्या प्रमाणात तीव्र रोष निर्माण झाला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक ८) जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजता च्या दरम्यान काही भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पील्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जख्मी केले. लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ धाव घेत हरणाच्या पिल्याला कुत्राच्या तावळीतुन त्याचे जीव वाचवले. आणि गावातच एका सुरक्षित जागी ठेवले. सरपंच रेखाताई वरठी यांनी घटनेची सुचना संजय सत्येकार यांना दिली.
संजय सत्येकार यांनी घटनास्थळ गाठुन तात्काळ याची सूचना वन विभागाच्या नागपूर येथील रेस्क्यू विभागाच्या सेंटर ला दिली. परंतु त्यांचा कडून पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही व कसले ही मदत तर दूर परंतु फोनवर बोलतांना मध्येच रेस्क्यू सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी फोन कट केला. परत फोन केला असता परंतु त्यांनी याची गंभीर्ता घेतली नाही. जख्मी हरणाला वेळेत उपचार न भेटल्याने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निष्पाप हरणाचा मृत्यु झाला.
तरी सुद्धा वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आलेले नाही. घटने नंतर नागरिकांन मध्ये वनविभागा विरोधात मोठ्या प्रमाणात तीव्र रोष निर्माण झाला असुन शासन प्रशासनाने सदर घटनेची योग्य चौकशी करून अशा बेजवाबदार व निष्काळजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी आणि प्राणी प्रेमी यांनी केली आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या