कन्हान येथे निशुल्क नेञ तपासणी व रक्त गट तपासणी शिबिर संपन्न
कन्हान-कन्हान येथे आपला आमदार आपल्या सेवी अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप व रक्त गट तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, नगर परिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मे आय बॅंक हाॅस्पीटल, नागपूर येथील तज्ञ डाॅक्टर अरविंद डोंगरवार यांच्या द्वारे नागरीकांची निशुल्क नेत्राची तपासणी करण्यात आली व स्मर्क प्यारा मेडिकल तर्फे रक्त गट तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण ३४८ लाभार्थांनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं ६८, औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं ५६, व चष्मे करिता २२४ लाभार्थांनी लाभ घेतला. शुक्रवार दिनांक ४ऑगस्ट रोजी मोफ़त चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय नागपूर जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर, प्रदीप गायकवाड, निक्कू पिल्ले, मनोज बैटवार, श्रीचन शेंडे, प्रशांत स्वामी, मंदीप सिंग, छोटू राणे, अनिल ठाकरे, अजय चव्हाण, मनीषा चिखले, सुनीता वैद्य,चिंटू वाकुळकर, हरीष तिड़के, पूजा सुगंधे, कुंदा मोटघरे, नंदा घोगळे, वैशाली श्रीखंडे, कल्पना नागरकर, ममता दास,प्रतिमा रोहनीकर, सुमित कामड़े, उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी आपला आमदार आपल्या सेवी अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या