शिक्षकाने दारु च्या नशेत घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश नगर येथील रहिवासी शिक्षक मृतक नामे विष्णु भरडे याने आपल्या राहत्या घरी दारु च्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी बंडु भरडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी बंडु केशव भरडे वय ४३ वर्ष आंबोली ता.चिमुर जि.चंद्रपुर
हे तिघे भाऊ असुन एक बहीण आहे.१) बंडु भरडे २) राजु भरडे ३) विष्णु भरडे ४) सौ.शारदा ननावरे असे असुन सर्वांचे लग्न झाले आहे व आप आपल्या परीवारासह राहतात. बंडु भरडे यांचा माझा ३ नंबर चा भाऊ नामे विष्णु केशव भरडे वय ३५ वर्ष रा.गणेश नगर कन्हान हा मागील ८ वर्षापासुन विकास विद्यालय कन्हान येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता.
गुरवार (दि.२७) जुलै रोजी सकाळी ७३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलिसांनी बंडु भरडे यांचा भाऊ नामे राजु भरडे मो.९२०९३३२५५४ या क्रमांका वर फोन केला आणि सांगितले की विष्णु भरडे यानी गळफास लावलेली डेडबॉडी त्याचे राहते घरी गणेश नगर कन्हान येथे मिळाली आहे.
या वरून राजु भरडे यांनी बंडु भरडे ला जाऊन सांगितले यावरून बंडु भरडे हे आंबोली वरून आपल्या चुलत भाऊ नामे पुरूषोत्तम भरडे यांचा सोबत ग्रामीण रुग्णालय कामठी येथे जाऊन पाहिले असता विष्णु याने त्याचे राहते घरी गळफास लावल्याने हा मृत अवस्थेत दिसला बंडु भरडे यांनी त्यास ओळखले.
मृतक विष्णु हा दारू पिण्याच्या सवयीचा असुन त्याची पत्नी नामे माधुरी विष्णु भरडे वय ३० वर्ष ही त्याचे राहते घरून मुलगी कु.हिरा वय ४ वर्ष हिला घेऊन मागील चार पांच दिवसा पुर्वी तिचे माहेरी बेलगाव ता. भद्रावती जि.चंद्रपूर येथे निघुन गेली.
विष्णु हा दारू पिण्याच्या सवयीचा असून त्याने दारूच्या नशेत गळफास लावला असावा त्याचे मरणाबाबत बंडु भरडे यांना कोणावरही शक संशय नसल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी बंडु भरडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक ३१२३ कलम १७४ जा.फौ गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या