Advertisement

राजेंद्र मुळक सहायता कक्षाला लोकांचा जंगी प्रतिसाद

राजेंद्र मुळक सहायता कक्षाला लोकांचा जंगी प्रतिसाद

निमखेडा (तारसा):- दिनांक 13 जून 2023 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद  शाळा, निमखेडा (तारसा)  येथे – राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या संकल्पनेतून राजेंद्र मुळक सहाय्यता कक्षाच्या अंतर्गत आरोग्य,शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोफत मार्गदर्शन  व उपाय योजना करण्याकरीता राजेंद्र मुळक सहायता  कक्षाच्या माध्यमातून विविध रोगांच्या निदानासाठी आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर तसेच मोठ मोठ्या रोगांवरील उपचारासाठी व सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांची माहिती देऊन सर्वसामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित सामूहिक शिबिराचे उदघाटन  राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी केले.

तसेच कोरोना काळात पती गमावणाऱ्या महिलांना स्वावलंबी व स्वयंरोजगाराचा प्रश्न सोडवता यावा म्हणून. सिलाई मशिन वाटप करण्यात आले व महिला बचत गटाला पाण्याची कॅन व ग्रीन सिटिंग मॅट वाटप करण्यात आले. यावेळी या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. त्यात

1) डोळे तपासणी – 502,

2) मोफत चष्मा वितरण- 203,

3) सामान्य तपासणी- 587,

4) शस्त्रक्रिये करिता रुग्ण- 06,

5) मोतीया बिंदू शस्त्रक्रिया रुग्ण- 53

6) ECG तपासणी – 09,

7) स्त्री रोग तपासणी – 128,

8) बाल रोग तपासणी – 15,

9) आधार कार्ड अपडेट- 34,

10) आयुष्मान कार्ड- 40,

11) बांधकाम नोंदणी- 33,

12) नवीन व अपडेट राशन कार्ड नोंदणी-11,

13) ई श्रम कार्ड – 02,

14) निराधार नोंदणी – 18,

15) गट नोंदणी – 01

इत्यादी लाभार्थींनी लाभ घेतला व शिबिराचे धेय साध्य करण्यास कमालीची साथ दिली या वेळी सौ. रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद  नागपूर),ज्ञानेश्वर वानखेडे, शेषराव देशमुख, सौ शालिनी देशमूख, स्वप्नील श्रावनकर, ज्ञानेश्वर चौरे, राजेश ठवकर, लक्ष्मण उमाळे, सुनीता ताई यांगट्टी, श्रीनू यांगट्टी, युवराज ठाकरे, प्रमोद बरबटे, राधेश्याम मानकर, उमेश झलके, दिनकर नटीये, मनोज नौकरकर, मनोज झाडे, राजेंद्र लांडे, अनिल कोंगे, चंद्रभान किरपान, दादाराव सारवे, मंगेश तलमले, रोशन मेश्राम, करुणाताई भोवते, मीनाताई कावळे, विनायक घाटबांधे, आक्रोश पानतावणे, महेंद्र वाघ, पुरुषोत्तम राऊत, नाजूका शेंडे,पंढरी भालेराव, चिंना वेमुरी,अर्चना लांजेवार, कविता लिंगे, भूमिका रहांगडाले आदी मान्यवर व सर्व ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ता  तथा गावकरी मंडळी मोठ्या संख्येने शिबिरात आवर्जून उपस्थित होते.

१ )निमखेडा येथे शिबीराचे आयोजन 2 )मोफत मार्गदर्शन व मोफत तपासणी ३ )मोफत सिलाई मशीन वाटप

प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम–रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या