Advertisement

मुरबाड तालुक्यात भिषण पाणी टंचाई नागरिक हैराण : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह?

मुरबाड तालुक्यात भिषण पाणी टंचाई नागरिक हैराण : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह?

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलजीवन मिशन योजना हद्दपार

महाराष्ट्र मध्ये सुरु असलेल्या सत्ता डावपेच मध्ये नागरिकांचा किती नुकसान व हाल होत आहे, याकडे विधयमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्ष आहे का.? गरीब जनता पाण्याच्या अभावामुळे मरण्याला व हाणामारी करायला सुद्धा तयार झाली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकाना काय खरोखर पाण्याचे पाणी उपलब्ध आहे याचे छोटेसे उदाहरण आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पडली आहे पाण्याची भीषण टंचाई.

मुरबाड:- सालाबाद प्रमाणे पावसाळा संपुन शेतातील रोजगार संपला की कायम रोजगारासाठी ग्रामीण भागातील  शेतमजूराला भटकंती करावी लागते. परंतु डिसेंबर संपला की उन्हाळ्याची दाहकता अधिक वाढु लागते. त्यामुळे टिचभर पोटासाठी वणवण भटकणाऱ्या मजुराला भटकंती करावी लागते.

ती घोटभर पाण्यासाठी हि भटकंती रोखण्यासाठी शासना कडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्या यशस्वी होत नसल्याने भेडसावणाऱी पाणी टंचाई निर्मुलनासाठी विशिष्ट प्रकारची लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.

या घोटभर पाण्यासाठी माणसे दाहिदिशा वणवण भटकंती करित असली तरी गावकुसाबाहेरील सर्व पाणवठ्यांनी देखील तळ गाठला असल्यामुळे मुरबाड तालुक्यात सध्या ४८ गावे व पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी पंचायत समितीने ७ टॅंकर उपलब्ध केले आहेत. हे टॅंकर दररोज चार-चार फेऱ्या मारत असल्याने २८ गावाला पाणी पुरवठा होत असला तरी, २० गावे दररोज पाण्या पासून वंचित रहात असल्याने त्यांना काटकसरीने पाणी वापरावे लागते.

नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनाने गावोगावी बोअरवेल तसेच विहीरी खोदलेल्या असल्या तरी त्या बोअरवेल ला आणि विहिरी कोरड्या पडल्या असल्याने शासनाकडून टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याने तो टॅंकर त्या विहिरीत खाली केला जातो.

त्या विहिरीतील पाणी आपल्याला जास्त मिळावे यासाठी त्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी भांगवाडी, फांगुळ गव्हाण, टोकावडे, वैशाखरे सायले, मोहरी, तोंडळी, सासणे, खोकाटे वाडी, अशा ठिकाणी आणीबाणी प्रमाणे, पाणी-बाणी पहावयास मिळत आहे.

तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात  भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना प्रगतीत असुन सध्या उद्भवलेल्या पाणी टंचाई ला सामोरे जाण्यासाठी ७ टॅंकर ने पाणी पुरवठा होत आहे.

ज्या ठिकाणी टॅंकर जात नाही त्या ठिकाणी ट्रॅक्टर टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जगदिश बनकरी उप-अभियंता पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती मुरबाड

प्रतिनिधी-राजेश भांगे,मुरबाड –ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या