कन्हान येथे आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा
कन्हान – शिवसेने च्या युवाकेंद्रित संघटने चे प्रमुख व माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री मा.आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस कन्हान येथे युवासेना पदाधिकार्यांचा वतीने रुग्णांना फळ, गरजु विद्यार्थांना स्टेशनरी व वृक्षारोपण करुन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.१३) जुन ला मा.आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस निमित्य कन्हान येथे युवासेना पदाधिकार्यांचा वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मा.हर्षल काकडे, रामटेक विधानसभा प्रमुख मा.विशाल बरबटे, यांचा मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी युवासेने च्या पदाधिकार्यांनी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मा.देवेंद्र गोडबोले आणि युवासेना जिल्हा प्रमुख मा.लोकेश बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये रुग्णांना फळ, गरजु विद्यार्थांना स्टेशनरी सामग्री वितरित व वृक्षारोपण करुन आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी युवसेना, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या