Advertisement

शितला माता मंदिर समिती व्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शितला माता मंदिर समिती व्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कन्हान-जय शितला माता मंदिर समिती जे एन रोड कांद्री कन्हान व्दारे परिसरातील इयत्ता १२ वी व १० वी च्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

नुकत्याच उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असल्याने कन्हान, कांद्री परिसरातील इयत्ता १२ वी व १० वी च्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा जय शितला माता मंदिर समिती, जे एन रोड कांद्री-कन्हानचे मार्गदर्शक डॉ अनिल मंगतानी व श्री संजय चौकसे यांच्या हस्ते इयत्ता १२ वी मध्ये धर्मराज विद्यालया तुन

१) प्रथम कु तनिष्का सतिश राऊत ९४.१७ % तर व्दितीय

२) कु रिया दास ९०.८३ % इयत्ता १० वी मध्ये बीकेसीपी शाळेतुन

३) प्रथम कु वैष्णवी सिंह ९४.२०%,

४) कु धनश्री शेंडे ९२.६०%,

५) कु. स्नेहा केसेट्टी ९२. ४० %, धर्मराज विद्यालयाची

६) कु यशस्वी सुरणकर ९४.४०%,

७) कु वेदिका वकलकर ८६.८०%,

८) कु. प्रतिक्षा गजभिये ८५%,

९) कु समिक्षा डेंगे ८४.६०%,

१०) हर्ष पारधी ८४.८०%

या दहा गुणवंत विद्यार्थ्याचा पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमेश साखरकर यांचा सुध्दा समिती व्दारे सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वामन देशमुख, पारस मरघडे, प्रकाश ढोके, वसंता राऊत, माजी ग्रा प सदस्य चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रितेश मेश्राम, रोशन बोरकर, नरेश बावने, ओलंदास लाडे, प्रकाश हटवार, गोकुल पटेल, प्रेमचंद चौव्हाण, चंद्रशेखर पाशी व विद्यार्थी पालकगण प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्याना आणि उपस्थितांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या