डिव्हायडरवर चढली कार, मनसर-कांद्री वस्ती जवळ अपघात
दिनांक 12 जुन रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास क्रुझर जिप क्र . M P -17 -Z B -7197 हि महामार्ग क्र 44 वर रामटेक तालुका अंतर्गत येणाऱ्या कांद्री वस्ती येथे डिव्हायडर वर चढुन जवळपास 100 मिटर पर्यंत रखडत गेली निदर्शनात आले कि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीं.
आर. टि. ओ. चेक पोस्ट कांद्री वस्ती येथे लागुनच असलेले कांद्री वस्ती हे गाव नागपूर जबलपुर महामार्गावर असुन बोंद्री व हिवरा हा जोडमार्ग आहे . हा चौरस्ता अपघात प्रवण स्थळ झालेला असुन महामार्ग प्राधीकरणाने हा चौरस्ता एकीकडे बंद केला असल्यामुळे बोंद्री रोडवरून महामार्गावर चुकिच्या दिशेने यावे लागते.
यात नागपुर वरून जबलपुर मार्गे जाणाऱ्या दोन गाड्या समानांतर भरधाव वेगाने आल्यास बोंद्री कडून मनसर ला जाणाऱ्या गाडीला सामोरा समोर टक्कर होण्याची दाट शक्यता असते.
महामार्ग प्राधीकरणाने या कडे जात्तीने लक्ष देवून अपघात होणार नाही याचा मार्ग शोधावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यापुर्वी सुद्धा हया डिव्रायडरवर ट्रक ,कार ,ट्रॅक्टर अशा अनेक गाड्या छोटा डिव्हायडर व मधोमध डिव्हायडर असल्यामुळे रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या..! टूक च्या लाईटामुळे डिव्हायडर दुरुन दिसत नाही, परिणामी चार चाकी गाडी डिव्हायडर वर चढून क्षतिग्रस्त होते.
प्रस्तीनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक-नागपूर
0 टिप्पण्या