Advertisement

कन्हान येथे भव्य धम्म रैली काढुन बुद्ध पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न

कन्हान येथे भव्य धम्म रैली काढुन बुद्ध पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न

कन्हान  – रिपब्लिकन सांस्कृतिक संघ द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य भव्य धम्म रैलीचे आयोजन करण्यात आले होते. तथागत गौतम बुध्द प्रतिमा, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे कटआउट सह सुंदर देखावे व आखाडा प्रात्यक्षिक भव्य धम्म रैलीचे आकर्षण असुन परिसरात भव्य धम्म रैली काढुन बुध्द पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आला.

महाकारुणिक तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त शांती संदेश प्रेषित करण्यासाठी भव्य रैलीचे आयोजन कन्हान येथे करण्यात आले होते. पंचशील नगर सत्रापुर येथुन नागपुर-जबलपुर महामार्गा वरुन भव्य रैली काढण्यात आली.

ड़ॉ.आंबेडकर चौकातील बाबा साहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सकाळी पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगडे, आयोजक चंद्रशेखर भिमटे तर सायंकाळी भंते के.सी.एस लामा महाथेरो, सपोनि दिलीप पोटभरे,आयोजक चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर, चेतन मेश्राम, मनोज गोंडाने, रोहित मानवटकर, नितिन मेश्राम, विवेक पाटिल यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले. रैलीत गुरुकृपा अखाड्या चे प्रशिक्षक नीलेश गाढ़वे यांचे मार्गदर्शनात अखाड़ा पटु अनिकेत निमजे, सूरज चौहान, उज्वल कांबळे, सिद्धार्थ सातपैसे, निकिता बेले, प्राजी टाक़ळखेड़े, मनस्वी कांबळे, रानी गुडधे हयांनी विविध कलाचे आकर्षक प्रदर्शन केले.

तारसा रोड चौक ते सात नंबर नाका सुजाता बुद्ध विहारात महाकारूणी तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भंते के.सी.एस लामा महाथेरो यांच्या हस्ते माल्यार्पण करुन बुद्ध वंदने ने रैलीचे समापन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन नितीन मेश्राम तर आभार प्रदर्शन कैलास बोरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अश्वमेघ पाटिल, शैलेश दिवे, पंकज रामटेके, अभिजित चांदुरकर, रमेश गोड़घाटे, धनंजय कापसीकर, महेंद्र चव्हाण, राजेश फुलझेले, आनंद चव्हाण, मिलिंद मेश्राम, चंद्रमनी पाटील, संजय गजभिये, रविंद्र दुपारे, संजय चहांदे, अमोल मेश्राम, पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा उके, विनोद बावनगडे, मनोज शेंडे, नविन सहारे, नितेश टेंभुर्णे, निखिल रामटेके, जितेन्द्र टेभुर्णे, प्रविण सानेकर, अखिलेश मेश्राम, दिपचंद शेंडे, रुपेश सोमकु वर, अमीत नगरारे, विक्रांत कोंडपनेनी आदीनी परिश्रम घेतले.

विविध स्थळी धम्म रैलीचे जोरदार स्वागत

सत्रापुर पंचशील नगर बुध्द विहार ते सात नंबर नाका सुजाता बुद्ध विहारा पर्यंत च्या धम्म रैलीचे चंदन मेश्राम मित्र परिवार व्दारे महात्मा गांधी चौक येथे हलवा वाटप, राणे केटरर्स समोर अजय चव्हाण मित्र परिवार व दुकानदार संघाने खीर वाटप, होम पाईप सामोर सेजल ज्यूस सेंटर दारे खीर व ज्यूस वाटप तसेच सिद्धार्थ कॉलनी महिला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खीर वाटप, पंजाब नॅशनल बँक सामोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मिठाई व पाणी वाटप तसेच नाका नंबर सात सुजाता बुद्ध विहार च्या वतीने खीर वाटप आणि बादल कापसे मित्र परिवार च्या वतीने भव्य भोजंन दान वाटप करण्यात आले. विविध सामाजिक व राजकीय संघटना च्या वतीने धम्म रैलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या