रेल्वे मध्ये कोणाला कामाला लावू शकत नाही त्यांना स्टाॅल देऊ शकतो: पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य
मुरबाड मध्ये रेल्वे येणार यासाठी मुरबाड एमा डी सी हाॅल मध्ये पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी कपिल पाटील यांनी सांगितले की मुरबाड रेल्वे चे स्वप्न साकार झाले असून या आठवड्यात टेंडर निघणार असून बाधित शेतकरी यांनी 1 लाख गुट्टा असे भाव मागितले होते. मात्र शेतकरी यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शेतकरी यांना 6 लाख गुट्टा असे भाव दिला असल्याने मुरबाड मधील शेतकरी यांनी कोणत्याही प्रकारची अडचण न करता आपली जागा रेल्वे साठी उपलब्ध करून दिली.
मुरबाड मधील नागरिकांची अशी मागणी आहे की स्थानकाला नान शंकर शेठ हे नाव द्यावे व कपिल पाटील असं म्हणाले कोणाला शंका असेल तर त्यांनी माझेशी करावा! मी शेतकरी यांच्या बरोबर बसायला तयार आहे.
या पत्रकार परिषदेला मोहघर येथील महीला सरपंच सिमा भोईर यांनी सांगितले की बाधित शेतकरी यांना खरा न्याय कोणी दिले असेल तर कपिल पाटील यांनी! या कार्यक्रमा माजी आमदार दिगंबर विशे माजी आमदार गोटीराम पवार माजी सभापती मधुकर मोहपे लियाकत शेख, संतोष विशे, जयवंत सुर्यराव उल्हास, रामभाऊ बागर, मुरबाड तहसीलदार संदिप आवारी, तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.
राजेश भांगे मुरबाड
0 टिप्पण्या