तारसा ते पंढरपुर पायी तिर्थयात्रे चे शहर विकास मंच द्वारे जल्लोष स्वागत
कन्हान – आषाढी एकादशी निमित्य दरवर्षी प्रमाणे निघत असलेल्या श्री क्षेत्र तारसा जाईंड कन्हान रोड ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी तीर्थयात्रे चे कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सद्गुरु मुक्तानंद महाराज दत्तगुरु मठ राजीव गांधी नगर, नागपुर द्वारे आषाढी एकादशी निमित्य दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वर्ष २२ वे पालखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री क्षेत्र तारसा जाईंड कन्हान रोड ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी तीर्थयात्रा शनिवार दि.१७ जुन रोजी जेष्ठ अमावस्या दिनी पुजा अर्चना करुन श्री दत्तगुरु मठ चे ह.भ.प.श्री प्रल्हाद केशवरावजी हटवार मु.तारसा जाईंड कन्हान रोड येथुन पायदळ पालखी प्रस्थान झाली.
रविवार दि.१८ जुन रोजी दुपारी १२ वाजता पंढरपुर पायी तीर्थयात्रे चे कन्हान हनुमान मंदिर गांधी चौक येथे आगमन झाले असता शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी पालखीचे फुलाच्या वर्षाने जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर हनुमान मंदिरात पुजा अर्चना करुन भजन कीर्तन करण्यात आले.
पंढरपुर पायी तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोहार वितरित करण्यात आले. कार्यक्रमा च्या शेवटी शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी, नागरिकांनी पालखीचे पुष्प हार अर्पण करुन, पुजा अर्चना करुन पालखीचे नागपुर मार्गाने होऊन पंढरपुर च्या दिशेने रवाना केले.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार कमल यादव, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, मोहनसिंग यादव, नंदलाल यादव, उमेश यादव, भरत सावळे, प्रभाकर रुंघे, शहर विकास मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, योगराज आकरे, सामाजिक कार्यकर्ता माधव वैद्य, अरविंद कटाले, प्रकाश कुर्वे, सचिव यादव, संजय तिवसकर, सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रतिनिधि-ॠषभ बावनकर-कन्हान


0 टिप्पण्या