अवैधरित्या विना परवाना रेती उत्खनन करणाऱ्या दोन आरोपी ला ट्रॅक्टर सह पकडले
कन्हान पोलीसांची कारवाई , एकुण १२ लाख २ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिंगारदीप शिवारातील कन्हान नदी पात्रातुन दोन आरोपी अवैधरित्या विना परवाना रेती उत्खनन करुन ट्रॅक्टर ट्राली मध्ये भरतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी ला अटक करुन त्यांचा जवळुन दोन ट्रॅक्टर ट्राली , रेती , व इतर साहित्य सह एकुण १२ लाख २ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.१४) जुन ला सकाळी पहाटे ५ ते ६ वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस अमलदार अश्विन गजभिए , पोलीस हवालदार मुदस्सर जमाल , सचिन वेळेकर , दिपक कश्यप , निखील मिश्रा , सह आदि पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि सिंगारदीप शिवारातील कन्हान नदीचे पात्रातुन दोन आरोपी दोन ट्रॅक्टर द्वारे अवैधरित्या विना परवाना रेती उत्खनन करून ट्रॅक्टर ला लागून असलेल्या ट्राली मध्ये भरणे सुरु आहे .
अश्या माहिती वरून पोलीसांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना देवून त्यांचा आदेशाने पोलीस अमलदार अश्विन गजभिए , पोलीस हवालदार मुदस्सर जमाल , सचिन वेळेकर , दिपक कश्यप , निखील मिश्रा , सह आदि पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने रवाना होऊन मौजा सिंगादप चौकात दोन पंच यांना बोलावून त्यांना मिळालेल्या माहिती नुसार कारवाई करण्यासाठी सोबत चालण्याची विनंती केल्याने दोघांनी सहमती दिल्याने कन्हान नदीचे पात्रात लपत छपत गेले असता सदर घटनास्थळी दोन निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर मुंडा जय मधील एकाचा क्र.एम एच-४०-सीए-६६७० व दुसऱ्याचा क्र.एम एच-४०-बीजे-१३२७ या दोन्ही ट्रॅक्टर ला हिरव्या रंगाची ट्राली लागलेली असून ट्रॅक्टर क्र. एम एच-४०-सीए-६६७०ला लागलेल्या ट्राली मध्ये एक ब्रास रेती व एम एच-४०-बीजे-१३२७ ला लागलेल्या अंदाजे पाच घमेले भरलेली रेती दिसुन आली .
दोन्ही ट्रॅक्टर जवळ प्रत्येकी एक शेंदरी रंगाचे प्लास्टिक चा घमेला व एक प्लास्टिक दांडा लागलेला लोखंडी पावड़ा ट्रॅक्टर जवळ पडलेला दिसून आला . सदर दोन्ही ट्रॅक्टर जवळ दोन इसम हजर मिळाल्याने पोलीसांनी पंचासमक्ष त्यांचे नाव विचाले असता त्यांनी आपले नाव नामे
१) चंद्रशेखर श्रीराम ठाकरे वय ३८ वर्ष रा.संताजी नगर कांद्री कन्हान व २) अनिल वासूदेव आंबीलडुके रा.शिवनगर कन्हान असे सांगितले . आरोपी १) चंद्रशेखर श्रीराम ठाकरे हा ट्रॅक्टर क्र.एम एच-४०-सीए-६६७० (२) अनिल वासूदेव आंबीलडुके हा ट्रॅक्टर क्र.एम एच-४०-बीजे-१३२७ चा चालक असून त्या दोघे ही ट्रक्टर जवळ मिळून आलेल्या घमेले व पावडयाने अवैधरित्या रेती उत्खनन करून दोन्ही ट्रक्टर मध्ये रेती भरून विना परवाना वाहतूक करण्याचे नियोजन केले होते.
परंतु फक्त एकाच ट्रक्टर मध्ये रेती भरून झाल्यावर पोलीसांनी त्यांना पकडले असे पंचासमक्ष सांगितल्याने यावरून नमूद रेती हि चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी ला अटक करुन त्यांचा जवळुन दोन ट्रॅक्टर ट्राली , रेती , व इतर साहित्य सह एकुण १२ लाख २ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी अश्विन गजभिए यांचा तक्रारी वरून आरोपी १) चंद्रशेखर श्रीराम ठाकरे , २) अनिल वासूदेव आंबीलडुके यांचा विरुद्ध ३७९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीला सुचना पत्र देऊन सोडण्यात आले . सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या