Advertisement

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांना साडी वितरण करुन आषाढी एकादशी थाटात साजरी

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांना साडी वितरण करुन आषाढी एकादशी थाटात साजरी

कन्हान – कन्हान शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांना साडी वितरण करुन आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.

गुरुवार ला आषाढी एकादशी निमित्य रुक्माई भजन मंडळ कन्हान द्वारे शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिरात सर्व प्रथम महिलांनी विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे दही, दुधाने जल अभिषेक करुन पुचा अर्चना केली. त्यानंतर मंदिरात महिलांनी भजन कीर्तन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना साडी वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करीत आषाढी एकादशी उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी भारती महल्ले, मीरा तिडके, पुष्षा लाडेकर, सुनीता मानकर, सह भजन मंडळातील महिला प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या