कांद्री येथे विठ्ठल रुक्मिणी ची पुजा अर्चना करुन आषाढी एकादशी थाटात साजरी
कन्हान – शहरातील शितला माता मंदिर कांद्री कन्हान पंच कमेटी द्वारे संताजी सभागृह कांद्री येथील संत संताजी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी ची विधिवत पूजा अर्चना करुन आषाढी एकादशी उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
गुरुवार दि.२९ जुन ला शितला माता मंदिर कांद्री कन्हान पंच कमेटी द्वारे संताजी सभागृह कांद्री येथील संत संताजी मंदिरात आषाढी एकादशी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित तेली समाज कन्हान – कांद्री चे माजी अध्यक्ष मा.पतिराम देशमुख यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची षुष्प हार माल्यार्पण करुन पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असुन कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी विठ्ठल रुक्मिणी ची पुष्प अर्पित करुन पुजा अर्चना केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करुन आषाढी एकादशी उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, ओमदास लाडे, मनोहर मदनकर, तुकाराम चकोले, बादल विश्वकर्मा, राजेश पोटभरे, शेखर पाचे, गोकुल पटेल, प्रेमचंद चव्हान, प्रकाश ढोके, रोशन बोरकर, मानस झिंगरे, आरव झिंगरे, सह आदि नागरिक उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक
0 टिप्पण्या