विविध सामाजिक उपक्रमाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस जिल्हा परिषद आष्टी गटात संपन्न
हदगाव/नांदेड:- शासन सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा निर्णय घेणार, जनतेच्या हितासाठी प्रशासन सदैव तत्पर: जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची जोड देऊनच शेती करावी: कुलगुरू डॉ.इंद्र मनी.
दिनांक 14 महाराष्ट्र शासन,जिल्हा प्रशासन सर्वसामान्यांच्या हितासाठी तत्पर असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सदैव प्रयत्न करील असे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 63 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या पिंपळगाव ता.
हदगाव येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना नांदेडचे जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची कुलगुरू डॉ. इंद्र मनी मिश्रा तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव कदम कोहलीवर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर,उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार विनोद गुंडमवार, प्रभारी तहसीलदार दामोदर जाधव,गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील,दिलीप जाधव,गटशिक्षणाधिकारी किशन फोले, भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान,राम सुर्यवंशी, स्वप्निल रामगिरवांर, मोरेश्वर माने,अविनाश कदम यांच्यासह हदगाव तालुक्यातील विविध खाते प्रमुख कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी बोरगावकर म्हणाले की महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राला नवे वाळू धोरण मिळाले, नव्या वाळू धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून येणाऱ्या काळातील सर्वांना स्वस्त दरात वाळू मिळणार आहे, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुका प्रशासनाने गंभीरतेने लक्ष घालून तात्काळ सोडाव्यात, हलगर्जीपना करू नये कोणत्याही कर्मचाऱ्याने कार्यालयात अनुपस्थिती राहू नये सूचना देखील जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी दिल्या.
यावेळी प्रास्ताविक करताना आयोजक भागवत देवसरकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील पाच दिवसांपासून साडी चोळी,शेतकरी बांधव यांना बियाणे वाटप, राशन कार्ड वाटप शासन आपल्या दारी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अश्या विविध समाज,शेतकरी विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यासंदर्भात माहिती दिली,येणाऱ्या काळात प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील,इतर अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना महिलांना,नागरिकांना आवश्यक ती मदत केली असल्याची माहिती देखील भागवत देवसरकर यांनी दिली.
यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी शेतकऱ्यांना आधुनिक ते बरोबरच राज्य सरकारच्या वतीने देणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन समृद्ध बनावे असे आवाहन केले, विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे व आवश्यक ती सर्व मदत शेतकऱ्यांना करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली, भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेला कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी बोरगावकर व कुलगुरू डॉ.इंद्र मनी मिश्रा यांनी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सर्वच प्रमुख विभागाने स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या सोडवल्या व जाणून घेतल्या, अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ यावेळी देण्यात आले, अनेकांना प्रमाणपत्राचे वाटप देखील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमास परिसरातील गावातील नागरिक सरपंच उपसरपंच चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष अनेक पक्षाचे पदाधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक पोलीस पाटील यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अक्षय पतंगे, ग्रामसेवक करपे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वस्त धान्य दुकानदार सचिन भाले यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश कदम, शेख रहीम, सचिन पाटील, अनिल देवसरकर पांडुरंग जाधव गणेश नवांते आदींनी विशेष परिश्रम घेतले..
प्रतिनिधी: तुकाराम चव्हाण, हदगाव
0 टिप्पण्या