विनापरवाना रेती चोरी करुन वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर व टिप्पर ट्रक ला पकडले
कन्हान पोलिसांनी पुढील कार्यवाही करिता महसुल विभागाच्या पथकाला केले स्वाधिन
कन्हान – कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटातुन महिंद्रा ट्रॅक्टर ट्राली आणि राष्ट्रीय महामार्गा वर टिप्पर ट्रक अवैधरित्या विना परवाना रेती चोरून वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी ७ ब्रॉस रेती सह दोन आरोपीना ताब्यात घेऊन तहसीलदार पारशिवनी यांना माहिती देऊन पुढील कारवाई करिता महसुल विभागाच्या पथकाला स्वाधिन करण्यात आले.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक.११ जुन ला रात्री ११.३० वाजता च्या दरम्यान कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटातुन शुभम राजेश सोमकुवर वय २३ वर्ष रा.सिहोरा हा आपल्या महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४० एल ७१३८ ने अवैधरित्या विनापरवाना १ ब्रास रेती चोरून नेताना सिहोरा गावात कन्हान पोलीसांनी पकडले.
तसेच सोमवार दिनांक.१२ जुन ला पहाटे सकाळी ०४.२४ वाजता च्या दरम्यान टिप्पर ट्रक क्र.एम एच ४० बी एल ६४०२ चा चालक नागेश कुंभारे वय २६ वर्ष रा. खापरखेडा हा आपले मालक निखिल गभने वय ३५ रा. खसाळा याचे सांगण्यावरून टिप्पर ट्रक मध्ये अवैधरित्या विनापरवाना ६ ब्रास रेती चोरून नेतानी कन्हान राष्ट्रीय महामार्गावर कन्हान पोलीसाना मिळुन आला. दोन्ही वाहना कडे शासनाची रॉयल्टी नसुन गाडी ओवरलोड होती.
सदरची कारवाई कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले, पोलीस नायक महेश बिसने, निखिल मिश्रा व चालक पोलीस नायक जितेंद्र गावंडे यांनी केली आणि वरिष्ठाच्या आदेशाने दोन्ही वाहनाची माहीती पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार मा.हनुमंत जगताप साहेब यांना देताच त्यांच्या सुचनेने त्यांचे फिरते पथकाचे कर्मचारी रिजवान अन्सारी, कृष्णा माने यांचा पथकाला पुढील कायदेशीर कारवाई करिता स्वाधिन करण्यात आले.पारशिवनी तहसीलदार मा.हनुमंत जगताप साहेब दोन्ही वाहनावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या