Advertisement

कन्हान येथे शिवसेने चा ५७ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

कन्हान येथे शिवसेने चा ५७ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

कन्हान – कन्हान आंबेडकर चौक शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेने चा ५७ वा वर्धापन दिवस कार्यक्रम विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.

सोमवार दि.१९ जुन ला शिवसेने चा ५७ वा वर्धापन दिवस निमित्य शिवसेना महिला आघाडी कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा.वर्धराज पिल्ले, मा.अनिलजी जैस्वाल, नगरसेवक डायनल शेंडे, दामोदर बंड, पी.डी जैस्वाल, कृष्णकुमार अग्रवाल सह आदि प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांचा सत्कार करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी वर्धराज पिल्ले, अनिलजी जैस्वाल यांनी शिंदे सरकार च्या योजना बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सैकडो आशा वर्कर यांना मान्यवरांचा हस्ते छत्री आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन शिवसेने चा ५७ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन लता लुंडरे यांनी केले आणि आभार अनिल ठाकरे यांनी केले.

या जेष्ठ पत्रकार चंद्रकुमार चौकसे, प्रसंगी छोटु राणे, प्रदीप गायकवाड, हरिष तिडके, अजय चव्हान, प्रकाश तिवारी, भारत पगारे, शाहरुख खान, निकु तिवारी, मनिषा चिखल, माया तितरमारे, वैशाली श्रीखंडे, सुनिता वैद्य, पुजा सुगंध, पवनीकर ताई, कोमल लांजेवार, केदा मोटघरे, ममता दास, विद्या बहादुले सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या