विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाने आषाढी एकादशी महोत्सव उत्साहात साजरा
कन्हान-शहरातील शिवजी नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाने आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
गुरुवार ला आषाढी एकादशी निमित्य शहरातील शिवजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे दही, दुधाने जल अभिषेक केले. त्यानंतर नागरिक व भाविकांनी पुजा अर्चना केली. त्यानंतर दुपारी मंदिरात सरस्वती भजन मंडल कन्हान द्वारे भजन कीर्तन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करुन परिसरात आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गीता भिलकर, भारती महल्ले, मीराबाई तिडके, सतीश लोडेकर, राजेंद्र बावणे, मनिष कुरडकर, अजय भोस्कर, उज्जवल तितरमारे, प्रकाश तितरमारे, अनुराग महल्ले, पवन राजुरकर, वंश बावणे, कृणाल राजपूत सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक
0 टिप्पण्या