कन्हान येथे शितला मातेचे पुजन करुन गाव पुजा थाटात संपन्न
कन्हान – शहरात निसर्गाची कृपा व्यवस्थित राहुन बळीराजा सह गावकरी सुखाने नादावी याकरिता गाव पुजा मिरवणुक काढुन शितला मातेचे विधिवत पूजन करुन गाव पुजा मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.२७) जुन ला शहरातील महिला आणि मातोश्री भजन मंडळ द्वारे यावर्षी पावसाळा व सर्व ऋृतु चे आगमण होऊन सगळीकडे सुख समुध्दी नांदण्या करिता गाव पुजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी प्रदीप हुड यांचा घरून मातेचे विधिवत पूजा अर्चना करुन होम पाईप कंपनी येथे असलेल्या शितला माता मंदिरा पर्यंत मोठ्या उत्साहात गाव पुजा मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात महिलांनी शितला मातेचे विधिवत पूजा अर्चना करुन भजन, कीर्तन, आरती करुन परत मिरवणुकीचे प्रदीप हुड यांचा घरा जवळ समापन करुन गाव पुजा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सौ.वनिता कावळे, रंजना भोयरकर, उषा बंड, शारदा शिवरकर, विना हुड, वनिता चकोले, उमा पाहुणे, माया तितरमारे, शकुन पाहुणे, कविता इंगुळकर, लता उन्हाळे, अरुणा ठाकरे, सुनिता वाडीभस्मे, सुषमा गिऱ्हे, हर्षाली राऊत, पुनम नानवटकर, धनजोडे ताई, आंबिलडुके ताई, मेश्राम ताई, सोनटक्के ताई, सहारे ताई, खोब्रागडे ताई, घोटेकर ताई, वाटकर ताई आदि सह महिला बहु संख्येने उपस्थित होत्या.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर, कन्हान
0 टिप्पण्या