Advertisement

शिरवली धरणातील गाळ तसाच! गाळ काढण्याचे नावाखाली भराव काढण्याला प्राधान्य

शिरवली धरणातील गाळ  तसाच! गाळ काढण्याचे नावाखाली भराव काढण्याला प्राधान्य

मुरबाड:- मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरवली धरणाच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे कामाला जिल्हाधिकारी यांचे सुरुवात झाली असली तरी गाळ आहे तसाच ठेवून कोपऱ्यातील मुरुम तसेच माती भराव काढण्याला प्राधान्य दिले जात असुन पाणी पुरवठा करणारी विहीर देखील नष्ट करण्यात आल्याने मुरबाड मधिल नागरिकांचा घसा कोरडाच राहणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शासनाचे लघु सिंचन, पाटबंधारे व वसुंधरा या सेवा भावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिरवली, खुटल बारागाव,पेंढरी,पर्हे अशा विविध गावांमध्ये जलयुक्त शिवारातील तसेच धरणातील गाळ काढुन त्या ठिकाणी पाण्याचा अधिक साठा व्हावा.

त्यासाठी तो गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली असून तो कुजलेला गाळ हा शेतकऱ्यांना त्यांचे जमिनीतील उत्पन्न वाढीसाठी तसेच जमीन कसदार होण्यासाठी मोफत दिला जावा यासाठी प्राधान्य असताना, शिरवली येथिल धरणात असलेला गाळ काढण्यास प्राधान्य दिले जात नसुन धरण परिसरातील भराव काढण्यावर भर दिला जात आहे. जर तो गाळ काढला तर परिसरातील शेतकरी हे आपल्या शेतात दुबार पिके तसेच भाजीपाला करत असतात. धरणातील गाळ हा शेतकरयांना मोफत दिला जाईल अशी कोणतीही सुचना किंवा ताकीद प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याने शेतकरी या गाळमुक्त धरणातील मिळणाऱ्या  गाळापासुन वंचित आहेत.

ज्या धरणातील विहिरी पासुनमुरबाड शहराला पाणीपुरवठा होतो.त्या विहिरीची दुरुस्ती करण्यात ऐवजी ती विहिर नष्ट केल्याने मुरबाड शहराला पआटआद्वआरए पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे हे पाणी किती शुध्य असेल तो संशोधनाचा विषय असला तरी मुरबाड करांचा घसा कोरडाच राहणार हे स्पष्ट होत आहे.


!!! शिरवली धरणातील गाळ काढण्यास प्राधान्य असुन त्यास टाळाटाळ होत असेल तर संबंधित प्रशासनाकडे विचारणा केली जाईलसंदिप आवारी-(तहसिलदार-मुरबाड)


          !!!! शासनाचे जलयुक्त शिवारातील गाळ व धरणातील गाळ काढुन तेथे अधिक पाणी साठा व्हावा.व काढण्यात आलेला गाळ हा शेतकऱ्यांना विना मोबदला द्यावा जेणे करून त्यांच्या शेतातील उत्पन्न वाढेल हा त्या मागची उद्देश आहे. जर त्याला प्राधान्य दिले जात नसेल तर संबंधित ग्रामसेवका कडुन खुलासा मागविण्यात येईल. गजानन सुरोसे- (सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड)


प्रतिनिधी: राजेश भांगे,मुरबाड-ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या