विद्युत तारेच्या शाॅक लागल्याने महावितरण कंत्राटी कामगाराचा मृत्यु
कन्हान – कन्हान शहरातील खंडाळा गावाच्या बसस्थानका जवळ विद्युत खांबावर वीज दुरूस्ती चे काम करत असतांना महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाल्याने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक २२ जुन रोजी दुपारी ३३० ते ४ वाजता च्या दरम्यान तारसा रोड खंडाळा बसस्थानका जवळ महावितरण कंपनीचे लाईनमॅन व इतर कर्मचारी विद्युत दुरुस्ती चे काम करत होते. लाईनमॅन खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे तर मृतक श्रावण लक्ष्मण भारसाखरे (वय ५०) रा.पिपरी, कन्हान तिथेच खाली उभे होते.
एबी स्वीच उचलत असतांना श्रावण भारसाखरे अचानक खाली पडले. सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रावण भारसाखरे यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. सहकार्याने हात-पायांची मसाज करून कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्र रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारासाठी कामठी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान श्रावण भारसाखरे यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच सहाय्यक फौजदार सुर्यभान जळते, महेंद्र जळीतकर, सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी प्रल्हाद बुद्धलाल ओमकार (वय ३९) रा.हनुमान नगर कन्हान यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या