कन्हान येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे आमदार आशिष जयस्वाल यांचा हस्ते उद्घाटन
कन्हान – कन्हान गणेश नगर येथे रविवार ला शिवसेना नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, उपजिल्हा प्रमुख नंदू लेकुरवाडी, जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, कन्हान-पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा सौ.करुणा आष्टणकर, पारशिवनी नगर परिषद नगराध्यक्षा सौ. प्रतिभा कुंभलकर, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजू भोस्कर सह आदि मान्यवर प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांचा हस्ते गरजु विद्यार्थांना स्टेशनरी सामग्री वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक युवकांनी शिवसेना शिंदे गुट मध्ये प्रवेश केला. आमदार आशिष जयस्वाल यांनी शिवसैनिकांना संबोधित करतांना म्हटले कि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वात अनेक भागात रखळलेली विकास कामे तीव्र गतीने पुर्ण होत असुन गोर, गरीब, मजदुर, शेतरकरी आणि अनेक नागरिकांन करिता विविध योजना राबविले जात आहे. त्या संपुर्ण योजना प्रत्येक नागरिकांचा घरा पर्यंत पोहोचविण्याचे आव्हाहन शिवसैनिकांना केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी कन्हान नगर परिषद नगरसेवक डायनल शेंडे, शहर प्रमुख छोटू राणे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ.मनीषा चिखले, नगरसेवक अनिल ठाकरे, प्रकाश तिवारी, दीपक शिवरकर, बंडू तळवेकर, गौरव पनवेलकर, भूषण श्रीखंडे, शैलेश शेंडे, सौ.लता लुंडेरे, सौ.माया तितरमारे, सौ.वैशाली श्रिखंडे, सौ.सुनीता वैद्य, सौ.पुजाताई सुंगधे, सौ.पवनीकर ताई, सौ. कोमल लांजेवार, सौ.ममता दास, सौ.विद्याताई बहादूले, सौ.जोशीला कांमळे सह आदि शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या