Advertisement

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला आ.आशिष जयस्वाल यांची भेट

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला आ.आशिष जयस्वाल यांची भेट

पाहणी दरम्यान आरोग्य विभागाचे अनेक समस्या आल्या समोर

कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी भेट देवून पाहणी केली असता अनेक समस्या अडचणी दिसुन आल्याने प्रशासना च्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले असुन जयस्वाल यांनी प्रशासनाला झापुन त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे.

मागील अनेक वर्षा पासुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे समस्यांचा अंभार वाढत असुन नागरिकांची तपासणी व्यवस्थित होत नाही आहे. यातच डिलीव्हरी पेंशट ची सुद्धा पाहणी करीत नसुन अभद्र भाषेत व्यवहार केला जात आहे. या संर्दभात क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांना माहिती मिळताच त्यांनी गुरवार ला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.दिपक सेलोकर यांचा सोबत प्रशासनाची बैठक घेतली.

या बैठकीत मध्यंतरी घडलेल्या लहान बाळाचा मृत्यु प्रकरण चांगलाच तापला असुन प्रशासन द्वारे कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आमदार आशिष जयस्वाल यांनी संताप व्यक्त करुन प्रशासना ला झापुन सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषी वर कठोर कारवाई चे आदेश दिले.

बैठकीत रुग्णांनी सांगितले कि प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील नर्स, कर्मचार्‍यांची वागणूक बरोबर नाही, स्वच्छ बाथरुम, शौचालये, पिण्याचे पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. तसेच दवाखान्यात कर्मचार्‍यांची कमतरता, नियमित कर्मचारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होते, मुलभूत सेवा सुविधा पुरवण्यातही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. रुग्णांचा समस्या एकुण आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत करुन या बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार आशिष जयस्वाल यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यावेळी दिले.

प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे पाण्यासह इतर प्राथमिक सोयी-सुविधांसाठी रुग्णांना त्रास होणार नाही तसेच उपचारांकडे दुर्लक्ष करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.दिपक सेलोकर यांनी आमदार जयस्वाल यांना हमी दिली.

या प्रसंगी वर्धराज पिल्ले, नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर, मनिषा चिखले, वैशाली श्रीखंडे, छोटु राणे, राजेश यादव,भारत पगारे, प्रदीप गायकवाड सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या