उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या उपस्थितीत रामटेक मध्ये विभागीय आढावा बैठक संपन्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या उपस्थीतीत दिनांक 11 जुन रोजी रामटेक येथील गंगाभवनात विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यानी तालुका रामटेक व तालुका पाराशिवनी अंतर्गत केलेल्या शासकिय कामाची व विविध योजनेची माहीती उपलब्य करून दिली.
पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारांच्या कामांना पूर्ण करण्याचे आदेश देवेंद्र फडणविसांनी संबंधीत विभागाला दिले. प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा. असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.
उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते यांनी विविध योजनेचे सादरीकरण केले. आढावा बैठकीत वाळू व इतर गौण खनिज धोरणाची अंमलबजावणी,पांदण रस्ते, संजय गांधी निराधार योजना, सर्वांसाठी घरे, ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार हमी योजना, मनरेगा, अंतोदय अन्न योजना, सेतु केंद्र , पोलीस पाटिल नियुक्ती, कोतवाल नियुक्ती, आदी योजनांचा आढावा या प्रसंगी घेण्यात आला.
रामटेक येथील गंगाभवन येथे आयोजित उपविभागीय स्तरावरील या बैठकीला, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जायस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू शुक्ला, माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी यांच्यासह जिल्हा व उप विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थीती होती.
प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम, रामटेक-नागपूर
0 टिप्पण्या