Advertisement

जुन्या वादातून दोन गटात चाकू हल्ला : दोन ते तीन युवक जख्मी, पाच आरोपी अटक

जुन्या वादातून दोन गटात चाकू हल्ला : दोन ते तीन युवक जख्मी, पाच आरोपी अटक

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बुधवारी (दि.२१) जुन ला रात्री आठ ते नऊ वाजता च्या दरम्यान रायनगर येथील विकास हायस्कूलच्या मैदानात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीत चाकु हल्ला झाला. या घटनेला दोन ते तीन युवक जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी वरून पोस्टे ला पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम खंडारे यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री ८.३० च्या दरम्यान राम व कृष्णा यांनी बाजारातून चिकन आणून आईला दिले. त्यानंतर दोन्ही भाऊ विकास हायस्कूलच्या मैदानावर फिरायला गेले.

दरम्यान रामला सिगरेट ओढायची होती म्हणून त्याने खिशातून सिगारेट काढली आणि ती पेटवली. त्याचवेळी सोनू गुप्ता, रोहन चव्हाण, शुभम सिडाम हे कृष्णा जवळ आले आणि काही न बोलता रोहन चव्हाण, शुभम सिडाम ने कृष्णा ला हातबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सोनू गुप्ता ने खिशातून चाकू काढून कृष्णाच्या डाव्या पायावर व हातावर वार केले. तिसरा वार पोटावर मारत असतानाच राम ने चाकू पकडला. ज्या मध्ये रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान जीव वाचवण्यासाठी दोन्ही भावांनी पळ काढत पोलीस स्टेशन गाठून सोनू गुप्ता, रोहन चव्हाण, शुभम सिडाम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.

सोनू गुप्ताच्या तक्रारीत असे सांगण्यात आले की त्यांचा भाऊ लालू गुप्ता यांचा कृष्णासोबत २०२१ मध्ये आईस गोला ठेल्यावर जोरदार वाद विवाद झाला होता. बुधवारी रात्री सोनू गुप्ता आणि त्याचे मित्र बाबू कुरेशी, रोहन चौहान यांचा सोबत विकास हायस्कूलच्या मैदानावर बसून सिगारेट ओढत होता. दरम्यान कुणाल खंडारे व त्याचा मोठा भाऊ राम उर्फ ​​गजनी खंडारे हे त्याच्याकडे गेले कुणाल ने सोनू गुप्ता जवळील सिगारेट हिसकावली आणि पिण्यास सुरुवात केली.

सोनु ने कृणाल ला म्हटले कि माझी सिगारेट परत दे, मी सिगारेट पैश्याने घेतली आहे. याच वेळी राम ने सोनू ला शिवीगाळ करून त्याचा गळा धरला आणि कृष्णाने शिवीगाळ करुन चाकू काढुन सोनू गुप्ता च्या उजव्या हातावर व उजव्या गुडघ्या चा वर वार करून जखमी केले. पोलीस स्टेशन गाठुन सोनू गुप्ता यांनी तक्रार केली. कन्हान पोलिसांनी जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर दोन्ही गटांच्या तक्रारी वरून पाच आरोपीं विरुद्ध कलम ३२४, ३४ भांदवि अन्वये दोन गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक करून सुचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या