Advertisement

कन्हान येथे दिंडी यात्रा काढुन आषाढी एकादशी उत्साहात साजरी

कन्हान येथे दिंडी यात्रा काढुन आषाढी एकादशी उत्साहात साजरी

कन्हान – शहरातील शिव मंदिर, शिवनगर, कन्हान पंच कमेटी द्वारे दिंडी यात्रा आणि मंदिरात विविध कार्यक्रमाने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.

गुरुवार दि.२९.जुन ला आषाढी एकादशी निमित्य शिव मंदिर शिवनगर कन्हान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी मंदिरात जल अभिषेक करुन विधिवत पूजा अर्चना केली.

दुपारी मंदिरात आरती करुन शिव मंदिर शिवनगर येथुन दिंडी यात्रा काढुन तुकाराम नगर, आंबेडकर चौक, तारसा चौक, इंदिरा नगर होऊन दिडी यात्रेचे शिव मंदिर शिवनगर येथे समापन करण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडी यात्रेचे फुलाच्या वर्षाने, शरबत वितरण करुन जल्लोषात स्वागत केले. शिव मंदिर शिवनगर येथे सायंकाळी महिलांनी भजन कीर्तन, आरती करुन परिसरात प्रसाद वितरण करुन आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी भगवान भुसारी, मनोहर वाटकर, राजेंद्र शेंदरे, भानुदास हुड, रंजीत बोरकर, प्रमोद सोनटक्के, राहुल ढोके, संजय रंगारी, अर्जुन सोनटक्के, शरद वाटकर, दिंगाबर सोनटक्के, सुशील सोनटक्के, रिता बर्वे, मीना वाटकर, सीमा बोरकर, रजनी कोकाटे, गवरी सोनटक्के, जयपुरकर, पोपटकर, लंगडे, नागपुरे, ठवकर, जोगवे सह आदि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या