Advertisement

जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे आंनद मेळावा उत्साहात थाटात संपन्न

जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे आंनद मेळावा उत्साहात थाटात संपन्न

कन्हान – जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे समाज भवन येथे आंनद मेळाव्याचे आयोजन करून थाटात संपन्न करण्यात आला.

शनिवार (दि.१३) मई ला समाज भवन हनुमान नगर कन्हान ला आंनद मेळाव्याचे आयोजन जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले यांचे अध्यक्षेत तर नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे हस्ते राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन आंनद मेळाव्याचे उदघाटन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आंनद मेळाव्यात जिजाऊ ब्रिगेड सचिव छाया ताई नाईक, पुष्पाताई चिखले, रंजनाताई इंगोले,अल्का ताई कोल्हे, कल्पनाताई श्रीखंडे, येलेकर ताई आदिं नी वेगवेगळे खादय पदार्थाचे स्टॉल लावुन सुंदर सजावट करण्यात आली असल्याने उपस्थितांनी वेगवेगळ्या स्वाधिष्ट पदार्थाचा लाभ घेत आंनद व्यकत केला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रिताताई बर्वे, मिनाक्षी भोयर, विद्या रहाटे, सपना इंगोले, प्रिती कुकडे, मायाताई भोयर, सुषमा बांते, आशा कैकाडे, श्रध्दा कडु, पुनम राठी सह जिजाऊ ब्रिगेड सदस्यांनी सहकार्य केले.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या