कामठी येथे महाराष्ट्र शासना च्या वतीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे शुभारंभ
कामठी: भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासना च्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अंतर्गत भोई लाईन नवी कामठी पोलिस स्टेशन मागे-कामठी, येथील आपला दवाखाना चे उदघाटन आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते 1मे ला करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, खंड विकास अधिकारी मंजूषा गराटे, उपजिल्हा रुगणालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॉ. नैना दुपारे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, नागरी आरोग्य केंद्र कामठी च्या डॉ शबनम खानूनी तसेच लोक प्रतिनिधि प्रामुख्याने उपस्तिथ होते. या दवाखाण्यात दुपारी 2 ते रात्री 10 दरम्यान पुर्णपणे निशुल्क सेवा पूरविण्यात येईल. उज्वल रायबोले महामंत्री भाजपा कामठी शहर द्वारे माहिरी सादर
प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी-नागपूर
0 टिप्पण्या