पारशिवनी तालुका खरेदी – विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप चा दणदणीत विजय
कन्हान – पारशिवनी तालुक च्या खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप ला दणदणीत विजय मिळवण्यात यश आले आहे.पक्षाच्या समर्थित उमेदवारांनी १५ पैकी १० जागा जिंकुन आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ही आपली पुर्ण ताकद लावली होती. त्यातील ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे काँग्रेस पक्ष्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बहुमत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ते पूर्ण होऊ शकले नाही. संस्थेच्या संचालक मंडळासाठी शनिवार २० मई रोजी मतदान व मतमोजणी पोलीसांच्या कडक बंदोबस्त मध्ये शांततेत पार पडली.
भाजपा समर्थित भारतीय शेतकरी विकास आघाडी च्या महासंघा कडून राजेश कडू, नेताजी खडतकर, सुरेश भगत, उत्तम सायरे, दिलीप वाळके, महिला संघाकडून विमल जगनाडे, छाया येरखेडे, ओबीसी संघाकडून चंद्रभान इंगोले, वीजेएनटी संघाकडुन कांचन गिरी या विजयी झाल्या.
सेवा सहकारी संघाकडुन भाजप चे अरुण लांजेवार बिनविरोध विजयी झाले. याच युनियन मधून काँग्रेस समर्थित आनंदराव काकडे, पुरुषोत्तम जवंजाळ, उमाजी बद्रे, शेषराव भलावी, रेखा भुजाडे बिनविरोध विजयी झाले. विजया नंतर भाजपा समर्थित भारतीय शेतकरी विकास आघाडी च्या महासंघ उम्मेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडुन गुलाल उडवुन मिठाई वितरित करुन परिसरात मिरवणुक काढुन विजय जल्लोष साजरा केला.
निवडणुकीत आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी आमदार मा.आशिष जैस्वाल, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधाकर मेंघर, माजी समाजकल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे, शंकर चहांदे, प्रकाश वंदे, भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजप तहसील अध्यक्ष अतुल हजारे, डॉ.प्रमोद भड, ओमप्रकाश पालीवाल, परसराम राऊत, जयराम मेहरकुळे यांनी परिश्रम घेतले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या