शहरात वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी
कन्हान शहर युवक काँग्रेस पदाधिकार्यांचे महावितरण कार्यालय मुख्य अभियंता यांना निवेदन
कन्हान :- कन्हान-पिपरी शहरात मागील कित्येक दिवसा पासुन दिवस – रात्र वीज सातत्याने वीज खंडित होत असल्याने सामन्य नागरिक त्रस्त झाल्याने कन्हान शहर युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी अध्यक्ष आकिब सिद्धिकी यांचा नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालय चे उप मुख्य अभियंता भगत यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे.
मागील एक ते दोन महिन्या पासून उन्हाचा पारा अतिशय वाढला आहे. तापमान सध्याचा स्थितीमध्ये ४४ अंश सेल्सिअस गेले आहे. आणि आणखी काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले असून नागरिकांना आवश्यक असेल तरच पाबाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.
कन्हान – पिपरी परिसरा मध्ये गेल्या कित्येक दिवसा पासून विजेचा लपंडाव सुरू असुन वीज ही नियमित दिवस रात्र खंडित होत आहे. विशेषता कन्हान परिसरातील इतर भागात रात्रीच्या वेळेस ची राहाते, परंतु विवेकानंद नगर, शिवाजी नगर आणि पटेल नगर वार्ड नं.७ ह्या भागातील वीज सतत जात येत आहे. चार ते पाच तास सतत बीज बंद राहते. कन्हान भागा मध्ये च हा परिसर येत असून दुजाभाव ची वागणूक येथील नागरिकांना देण्यात येत आहे. या परिसरात मध्यम वर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत, महिला, युवक आणि लहान बालके असुन दिवस रात्री च्या वेळेस वीज खंडित झाल्याने, गर्मीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सदर विषय गंभीर्याने घेत कन्हान शहर युवककाँग्रेस पदाधिकार्यांनी अध्यक्ष आकिब सिद्धिकी यांचा नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालय चे उप मुख्य अभियंता भगत यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन शहरात वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महावितरण कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगर परिषद नगरसेविका रेखाताई टोहने, प्रदीप बावणे, आनंद चकोले, अनस शेख, अर्शीद शेख, अल्फाज शेख, आनंद मेश्राम, मोहित मडामे, साहिल खान, आयुष यादव, ऋतिक मानकर, विवेक उमरकर, सलमान शेख, रोशन सिधराम सह आदि युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या