Advertisement

पारशिवनी तहसिल कार्यालयचा भोंगळ कारोबार: कधी मिळणार नागरिकांना हक्काच्या सुविधा

पारशिवनी तहसिल कार्यालयचा भोंगळ कारोबार: कधी मिळणार नागरिकांना हक्काच्या सुविधा

पारशिवनी- पारशिवनी तहसील कार्यालय येथिल कर्मचाऱ्यांचा आळशीपणा. कर्मचाऱ्यांचा दररोज चा वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० पर्यन टायमिंग असुन येथिल खूपशे कर्मचारी दहावाजाता तेतात तर काही कर्मचारी ११:०० च्या नंतर कार्यालय मध्ये उपस्थित होत असतात. आवक-जावक विभाग येथिल कर्मचारी कार्य असे हे आहे की येणाऱ्या पत्राची ताबडतोब इंट्री/खताई करुन पुढे पाठवणे, आणि ताबडतोब त्याची दखल घेणे गरजेचे असते.

मात्र येणारे पत्र हे आठ-आठ दिवस त्यांच्या टेबल वरती पेंडिंग पडलेले असतात असे दि. ०८-मे-२०२३ ला पुढाकार समाचार प्रतिनिधी यांच्या लक्षात येताच दखल घेतली. म्हणजे जनतेच्या कामाकरिता नियुक्त कर्मचारी आपल्या कामाप्रती किती सजग आहे! हे आपण ओळखू शकता. तहसील कार्यालय मधील कर्मचारी आपल्या कार्यात किती आळसी झाले हे लक्षात येते. तहसील कार्यालय मध्ये काही-काही विभाग मध्ये भरपुर त्रास दिला जातो. याची दखल सुद्धा घेतली जात नाही.

नागरिकांना शिल्लक कारणावरून टाळाटाळ करून, लाच न दिल्यांनी कामांकरिता दोन-दोन महीने येरझार करण्याची पाळी निर्माण करून नागरिकांना त्रास दिला जातो. ह्याठिकाणी दूरदुरून, लाबून खेडे-पाडे मधून नागरिक आपल्या कार्याकारिक तहसील कार्यालयात येत असतात पण अशिक्षित-गरीब नागरिकाना त्रास सहनकरून त्यांचा मन दुखावला जातो. नागरिक,शेतकरी, इतर व्यक्ती आपले काम सोडून एका कामांकरिता तहसील कार्यालय चे चक्कर मारीत असतो, पण तहसील कार्यालय पर्यत येण्याकरिता वाहन सुद्धा उपलब्ध नसतात. कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते कि येण्याकरीता साधन तर मिळतो, पण मात्र जाण्याकरिता साधन मिळत नाही.

एवढेच नाही तर प्रश्न असा निर्माण होतो कि आपण कोणाच्या सेवे करीता तहसील कार्यालय मध्ये अधीकारी, कर्मचारी बनुन आले आहोत?. याचा विचार ही..! कधी केला जात नाही.

रामटेक क्षेत्राचे स्थानिक आमदार आशिष जैस्वाल हे कार्यालयात कधीच फिरकत नाही. तहसील कार्यालय मध्ये काय चालले आहे, याचा कधीच आढावा घेत नसून, तहसिल कार्यालय मध्ये येऊन कर्मचारी कार्यालय ला उपस्थित आहे किंवा नाही, किती वाजता येतात हे कधीच बघितले जात नाही.

तहसील कार्यलय कर्मचारी यांच्या अश्या सवई मुळे जनतेला किती त्रास सहन करावा लागतो! या कडे कधी विद्यमान स्थानिक आमदारांनी लक्ष दिले का?. अशी विचारणा करणारे प्रश्न जनतेने केले, असुन आमदार जयस्वाल यांनी ताबडतोब दखल घेणे गरजेचे आहे. पारशिवनी सोबतच असा अन्याय का? होत आहे! असा प्रश्न ग्राम पातळीवरून स्थानिक नागरिक करीत आहे.

प्रतिनिधी: सतिश साकोरे-पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या